या गावात नाही एकही रस्ता, कार-बाईकशिवाय कसा करतात कसा प्रवास करतात? जाणून घ्या

नेदरलँडमधील गिथॉर्न हे गाव जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हजारो पर्यटक येथे येतात आणि येथील अद्भुत दृश्यांचा आनंद घेतात. या गावात एकही कार नाही नाही.

Giethoorn The Village Without Roads In The Netherlands
नेदरलँडमधील गिथॉर्न हे गाव जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे (Image Credit : Freepik)

देशात आणि जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सुंदरतेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक चारही दिशांनी येतात. आजही आपण अशा देशाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे एकही रस्ता नाही. आता तुम्ही विचार करत असाल की, असे कसे होऊ शकते, रस्त्यांशिवाय लोक कसे प्रवास करतील? हे असे गाव आहे जिथे सर्व लोक त्यांच्या कार बाईक ऐवजी बोट घेऊन फिरतात. नेदरलँडमधील गिथॉर्न या छोट्याशा गावाबद्दल आम्ही सांगत आहोत. हे गाव इतकं रमणीय आहे की, तुम्ही पाहून थक्क व्हाल.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

नेदरलँडमधील गिथॉर्न हे गाव जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हजारो पर्यटक येथे येतात आणि येथील अद्भुत दृश्यांचा आनंद घेतात. या गावात एकही कार नाही नाही. ज्याला कुठेही जायचे असेल ते बोटीच्या मदतीनेच जाऊ शकतात. इथल्या कालव्यात इलेक्ट्रिक मोटर्सच्या साहाय्याने बोटी धावतात, त्यातून लोकांची ये-जा असते.

हेही वाचा : जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीतील मयूरभंजला भेट देताय? येथे काय आहे खास, जाणून घ्या

लोकांना रस्त्याची गरज नव्हती

या बोटींचा आवाज खूपच कमी आहे. त्याचवेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गावातून जाणाऱ्या कालव्यावर काही लोकांनी लाकडी पूल तयार केले आहेत. या गावात 180 हून अधिक पूल आहेत. ज्यातून लोक कालवा पार करतात. नेदरलँडच्या या गावात सुमारे 3000 लोक राहतात. रस्ते नसलेले गिथॉर्न हे गाव दिवसा खूप शांत असते. येथे राहणाऱ्या लोकांची स्वतःची खाजगी बेटे असून ते कालव्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. जवळपास सर्व घरांची स्वतःची बोट असते.

1230 मध्ये वसले हे गाव

या गावाची स्थापना 1230 मध्ये झाली आणि सुरुवातीला त्याचे नाव गेटनहॉर्न होते. पुढे त्याचे नाव गिथॉर्न पडले. गावात कालवा बांधण्यामागेही एक इतिहास आहे. असे म्हटले जाते की, हे 1 मीटर खोल कालवे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत इंधनात वापरले जाणारे गवत वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले होते. उत्खननादरम्यान येथे अनेक तलाव आणि झरे तयार झाले. तेव्हा कदाचित कोणाला अंदाजही नव्हता की , गवत वाहतुकीसाठी केलेल्या कालव्यांमुळे हे ठिकाण एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर सामील होईल,.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:24 IST
Next Story
अशीही कृतज्ञता ! डॉक्टरांनी केलेल्या मदतीसाठी पेशंटकडून अनोखं थँक्यू, पाहून तुम्हीही म्हणाल…
Exit mobile version