Viral Video: जंगलातील प्राण्यांना पाहून आरडाओरडा करू नका, त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे, सुरक्षित ते अंतर ठेवलं पाहिजे आदी अनेक सूचना आपल्याला जंगल सफारी दरम्यान दिल्या जातात. तसेच सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पर्यटकांचा जंगलातील प्राण्यांसोबत कशा प्रकारे सामना होतो आणि या सगळ्यांतून पर्यटक त्यांचा जीव कसा वाचवतात हेसुद्धा अनेक व्हिडीओंतून आपल्याला पाहायला मिळतं. पण, आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मोठी दुर्घटना होण्याआधी टळली आहे.

जंगलात सफारी दरम्यान गाईड आणि ड्रायव्हर धरून काही जण गाडीत बसले आहेत. जेसन आणि सिएरा टोटन नावाचे जोडपे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसह टेक्सासमधील फॉसिल रिम वाइल्डलाइफ सेंटरला भेट देण्यासाठी आले होते. दोन वर्षांची चिमुकली मुलगी एका मोकळ्या चारचाकी गाडीत बसून जिराफ या प्राण्याला खायला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा जिराफाने चिमुकलीच्या हातातील अन्नाची पिशवी पाहिली नकळत त्या मुलीचा हात पकडला. पुढे नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: परदेशी व्लॉगरला ‘वडापाव’ची भुरळ! ‘तिने’ जाणून घेतली ४० वर्षांपासून दुकान चालवणाऱ्या विक्रेत्याची गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वाइल्डलाइफ सेंटरला भेट देण्यासाठी गेलेल्या कुटुंबाबरोबर एक धक्कादायक घटना घडते. जोडप्याची दोन वर्षाची मुलगी जिराफ या प्राण्याला अन्न खाऊ घालायला जाते. चिमुकलीच्या हातातातील अन्नाची पिशवी पाहून जिराफ घ्यायला जातो आणि नकळत चिमुकलीचा हात तोंडावाटे पकडून वर उचलतो आणि मग लगेचच तिला तिच्या आईच्या कुशीत टाकतो ; जे पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल आणि ते जंगलातील प्राणी आहेत त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे हेही नेहमी लक्षात ठेवा.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @expressnews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घटनेनंतर चिमुकली पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र या घटनेने मानवाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हे पाहता वाइल्डलाइफ सेंटर म्हणाले आहेत की, “आमच्या ग्राहकांची आणि प्राण्यांची सुरक्षा आमच्यासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाची असते.अशा प्रकारची घटना याआधी कधीच घडली नसली, तरी ती पुन्हा घडू नये यासाठी आम्ही तत्काळ कारवाई करत आहोत’ ; असे सांगण्यात येत आहे.