Matrimony Sites Whatsapp Chats Viral: लग्नासाठी मोठा हुंडा मागणारे, गाडी-दागदागिने यांसाठी अडून बसणारे नवरे, जाच करणारे सासू सासरे यांच्या अनेक बातम्या आपण आजवर ऐकल्या- वाचल्या आहेत. पण आता मॉडर्न युगात मुलीही अपेक्षांच्या बाबत मागे नाहीत. खरंतर स्त्री-पुरुष समानता ही कौतुकाची बाब आहे पण म्हणून होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा ठेवणाऱ्या महिलांचे समर्थन करता येणार नाही. साधारणपणे मागील काही काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पोस्टमधून मुलींच्या रुग्णाकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा वारंवार समोर आल्या आहेत. यातही अरेंज मॅरेज मध्ये असे प्रकार अधिक घडत असल्याचे आढळून आले आहे. सध्या एका लग्न जुळण्याच्या साईटवरून संपर्क झालेल्या विवाहेच्छुक तरुण- तरुणीतील चॅट्स व्हायरल होत आहेत, यातील तरुणीचे मेसेज पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

शादी.कॉम वर या दोघांची ओळख झाल्याचे चॅट्स मधून दिसून येत आहे. अर्पित नामक एका तरुणाने या मुलीशी Whatsapp वर संपर्क केला होता. यावेळी पहिल्या दोन मेसेजमध्येच ही मुलगी अर्पितला लग्नाविषयीचे त्याचे मत विचारते व तुला जर टाईमपास करायचा नसेल तरच बोलू असेही सांगते. यावेळी अर्पितला सुरुवातीला तिचं म्हणणं योग्य वाटतं व त्याला जोडून तो तिला मनाचं नातं जोडलं जावं अशी इच्छा बोलून दाखवतो. ज्यावर मात्र तरुणीचा सूर बदलतो व ती नातं वगैरे खोट्या कल्पना आहेत आणि मी खूप प्रॅक्टिकल विचार करते असं सगळं सांगू लागते.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

“माझ्या अपेक्षा जो पूर्ण करेल त्याला मी हो म्हणेन” असं ती म्हणते ज्यावर अर्पित तिला अपेक्षा विचारतो. तिची यादी पाहून थक्क झालेला अर्पित पुढे मग तिला तू समोरच्या मुलाच्या कोणकोणत्या अपेक्षा पूर्ण करू इछितेस असा प्रश्न करतो. तेव्हा मात्र ही तरुणी भडकून उलट सुलट उत्तर द्यायला लागते, शेवटाकडे तर ती अर्पितला चक्क शिवीगाळ करून ब्लॉक करण्याच्या सुद्धा धमक्या देते. या दोघांचे पूर्ण चॅट्स सध्या व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा<< कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली ‘ही’ कला; मुक्या जीवाचं प्रेम पाहून डोळे भरून येतील

दरम्यान, दीपिका भारद्वाज या अकाउंटवरून हे चॅट्स शेअर करण्यात आले होते, जे आता अन्यही फेसबुक युजर्स शेअर करत आहेत. तसेच यावरून खोट्या फेमिनिज्मला पाठिंबा देणाऱ्यांवर सुद्धा ताशेरे ओढले जात आहेत. “आज अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना असे वाटते की आपण एखाद्या पुरुषाशी लग्न करून काही उपकार करत आहोत. आजकाल महिलांमध्ये ही मानसिकता का वाढत आहे याचे आश्चर्य वाटते” असे दीपिका यांनी या फोटोसह पोस्ट केले होते.