Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगी अतिशय भन्नाट अशी डान्स करताना दिसत आहेत

सोशल मीडियावर नेहमीच लग्न, त्यातील गमतीजमती आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेक जण आपणही आपल्या लग्नात असंच काही भन्नाट करायचं असं काही जण ठरवतात. सध्याच्या काळात सगळीकडेच जोरदार हळदीचा धिंगाणा असतो. अशात एका हळदी कार्यक्रमातील करवलीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी कच्ची कली सड्डा मासूम चेहरा या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय.लग्न सोहळ्यात सर्वच व्यक्ती नाचून आनंदाने प्रत्येक क्षण एंजॉय करतात. पिवळी साडी नेसून तरुणीने केलेल्या या डान्सवर अनेक कमेंट्स आल्यात. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shweta_pandiit नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या तरुणीचं कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे.