Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगी अतिशय भन्नाट अशी डान्स करताना दिसत आहेत

लग्नात हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बँजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “गौरी भन्नाटली गौरी पिसाटली” या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी सर्व नातेवाईक याच तरुणीकडे पाहत राहीले आहेत. या तरुणीनं साडी नेसूनही डान्स करताना ज्या सहजतेने स्टेप्स केल्या, त्यावरून तिच्या डान्सिंगवर असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. तिच्या हावभावांतून, हातवाऱ्यांतून आणि लयबद्ध हालचालींमधून तिनं उपस्थितांच्या मनात जागा मिळवली. फक्त संभळच्या तालावर तिनं केलेला डान्स एकदम मर्यादेत आणि हसतमुख पद्धतीने सादर केला.

पाहा व्हिडीओ

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना डान्स करायला आवडतो. हल्ली अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण ट्रेंडिग रिल्सवर किंवा गाण्यावर व्हिडीओ बनवतात. लहान मुले, तरुण तरुणीबरोबर आता चाळीशी पन्नाशीतली माणसं सुद्धा आवडीने व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.

kuki0130 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, लय भारी. असाच आनंद घ्या आणि हसत रहा” तर एका युजरने लिहिलेय, “मराठी गाणं लय भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाईपण भारी देवा” एक युजर लिहितो, “आयुष्यामध्ये आनंद खूप महत्त्वाचा आहे.”