Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात पण पारंपारिक डान्सची कुठेही तोड नाही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.
प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर तरुणीनं जबरदस्त डान्स केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या तरुणीनं खानेदेशी पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच या पारंपरिक मराठमोळ्या गाण्यावर एका तरुणीने असा ठसकेबाज नृत्य परफॉर्मन्स केला की, पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत. नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि ‘हीच खरी खानदेशी पोर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, दिसणारी ही तरुणी पारंपरिक नऊवारी साडी, गजरा, कुंकू आणि हलकी नथ परिधान करून डान्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि देहबोलीतला मराठमोळा ठसा लक्ष वेधून घेतो. ती डान्स करत असताना, तिच्या प्रत्येक हालचालीत गाण्याचा ठेका, शब्दांची झुळूक आणि शुद्ध लय दिसते. ही केवळ एक डान्स परफॉर्मन्स नसून, तो एक संस्कृतीचा उत्सव वाटतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ gomzy_11 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, भारीच नाचली, तर अनेकांनी तरुणीच्या डान्सचं तोंड भरून कौतुक केलंय.
