Viral Dance Video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी माणसांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये डान्सचे व्हिडिओ अनेकदा बघायला मिळतात. यातले काही व्हिडिओ असे असतात की जे तुम्ही वारंवार बघत राहता. अनेकांना तो व्हिडिओ शेअर करता. असाच एक डान्सचा सुंदर व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या तरुणीनं मी साताऱ्याची या पारंपरिक मराठमोळ्या गाण्यावर एका तरुणीने असा ठसकेबाज नृत्य परफॉर्मन्स केला की, पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत. नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि ‘हीच खरी मराठमोळी कला’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, दिसणारी ही तरुणी पारंपरिक नऊवारी साडी, गजरा, कुंकू आणि हलकी नथ परिधान करून डान्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि देहबोलीतला मराठमोळा ठसा लक्ष वेधून घेतो. ती डान्स करत असताना, तिच्या प्रत्येक हालचालीत गाण्याचा ठेका, शब्दांची झुळूक आणि शुद्ध लय दिसते. ही केवळ एक डान्स परफॉर्मन्स नसून, तो एक संस्कृतीचा उत्सव वाटतो.

या तरुणीचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणीनंही असंच सादरीकरण केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झालाय. लाखो लोकांनी तो पाहिला असून हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील tejalshinde_official या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

डान्स व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,”सभ्यता. सुंदरता. संगीताचा आदर. कुठल्याही अंग प्रदर्शन नाही. अप्रतिम ताई” दुसऱ्या यूजरनं म्हटलं,”यालाच म्हणतात मराठी बाणा” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.