VIRAL VIDEO: रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरूणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या आम्ही तुम्हाला एका व्हायरल व्हिडीओबद्दल सांगत आहोत, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणीने चक्क रेल्वे स्टेशनवरच भन्नाट डान्स केलाय. तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा हा मस्त व्हिडीओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.

girl-danced-on-railway-station-trending
(Photo: Instagram/ _sahelirudra_)

सोशल मीडियाच्या युगात कोणताही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. युजर्स त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात जेणेकरून लोकांना त्यांच्या पोस्ट आवडतील. सध्या आम्ही तुम्हाला एका व्हायरल व्हिडीओबद्दल सांगत आहोत, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणीने चक्क रेल्वे स्टेशनवरच भन्नाट डान्स केलाय. तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल असा हा मस्त व्हिडीओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरूणीने रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘सात समुंदर पार’ गाण्याच्या रिमिक्स ट्रॅकवर हा डान्स केलाय. या गाण्याच्या बीटवर या तरूणीने आपल्या डान्स मुव्ह्सने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ही तरूणी डान्स करत असताना आजुबाजुला प्रवाशांनी देखील मोठी गर्दी केली होती. ती एवढ्या जोशमध्ये नाचत आहे आणि तिचा तो उत्साह बघण्यासारखा आहे. हळूहळू इकडून तिकडून जाणारे प्रवाशी काही मिनिट तिचा हा डान्स पाहण्यासाठी थांबतात आणि तस तसा उत्साह आणखी तिचा वाढताना दिसून येतोय. तिच्या डान्सने सर्व प्रवाशांना तिने आकर्षित करून घेतले. सर्वजण तिथे डान्स बघण्यासाठी तसेच व्हिडीओ काढण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागले आहेत.

मनातील सर्व विचार, टेन्शन विसरून लोक तिच्याकडे आनंदाने पाहत आहेत. हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याही मनाची मरगळ घालवा. सध्या या तरूणीच्या डान्सच्या व्हिडीओची एकच चर्चा सुरूय. सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा हा व्हिडीओ पसरलाय. इन्स्टाग्रामवर अनेकजण सार्वजानिक ठिकाणी डान्सचा व्हिडीओ शूट करून ते रील्सवर अपलोड करतात. असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले सुद्धा असतील. मात्र, सार्वजानिक ठिकाणी जाऊन डान्स व्हिडीओ कसे तयार केले जातात, हे जर प्रत्यक्ष पहायचं असेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील तरूणीचं नाव सहेली रूद्र असं आहे. ती इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या ५ लाख इतकी आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिने डान्स केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत ३४ मिलियन लोकांनी पाहिलंय. तसंच दोन मिलियन लोकांनी तिच्या डान्सला लाइक केलंय. २४ हजार पेक्षा लोकांनी तिच्या डान्सच्या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या टॅलेंटचं कौतुक केलंय.

या तरूणीच्या व्हिडीओमधील आणखी एक विशेष बाब म्हणजे सार्वजानिक ठिकाणी डान्स करत असताना तिने करोना नियमांचं पालन करत आपल्या चेहऱ्यावर मास्क सुद्धा लावलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एकच धुमाकूळ घालताना दिसून येतोय. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून एकदम ताजेतवाने वाटले का? तुम्हीही कधी असा डान्सचा व्हिडीओ पाहिलाय का? आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नकात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girl danced on railway station trending on instagram the songs of saat samundar paar prp

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या