Girl Dance On Mumbai Local : आजकाल लोक रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसतात. त्यात काही दिवसांपासून मेट्रो, बस, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि इतर सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडीओ बनविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लाइक्स आणि व्ह्युज मिळविण्यासाठी यावेळी लोक काहीही करताना दिसतात. त्यांच्या अशा कृतीमुळे इतर लोकांना त्रास तर होतोच; पण तसे करणे धोकादायकही आहे. सध्या अशाच एका प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे; ज्यात मुंबईतील धावत्या लोकलमध्ये एक तरुणी भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करीत डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ पाहून आता युजर्स तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. त्याशिवाय तिच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, आता रेल्वे पोलिसांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी अचानक तिच्या सीटवरून उठून उभी राहते आणि लोकांच्या भरगर्दीत भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करीत डान्स करायला लागते. तरुणीचा हा डान्स पाहून शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही लाज वाटते. यावेळी काही प्रवासी तिच्या डान्सने अस्वस्थ झाल्याने उठून निघून जातात. या व्हायरल व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी खूप टीका केली आहे. तसेच ट्रेन, मेट्रो आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे डान्स करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

VIDOE : सायकलला बसवले कारचे स्टेअरिंग अन् स्वॅगमध्ये जातोय शाळेत; तरुणाचा जुगाड पाहून युजर्स अवाक्

दरम्यान, एका युजरने लोकलमधील या अश्लील डान्सचा व्हिडीओ एक्सवर शेअर करीत रेल्वेकडे तक्रार केली आहे. त्यावर रेल्वेने प्रतिसाद देत मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला या घटनेची चौकशी करून, आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे म्हटले आहे.

अश्लील डान्स करणाऱ्या तरुणीला नेटकऱ्याने केले ट्रोल

दरम्यान, अश्लील डान्स करणाऱ्या तरुणीला आता सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. मला वाटते की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अर्धनग्न चाळे करून रील काढल्या जात असतील, तर अशा व्यक्तींवर केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कारवाई करणे बंधनकारक आहे. तसेच भारतीय रेल्वेनेसुद्धा या विषयाचे गांभीर्य ओळखून विशेष पथकासह सदर महिलेवर भारतीय कलम २९४ अंतर्गत दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी एका युजरने केली आहे. तसेच काहींनी धावत्या ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना परवानगी दिली जाऊ नये, तसेच असे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर इतर काही लोकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करीत हे इतर प्रवाशांसाठी त्रासदायक आहे, असे म्हटले आहे.