scorecardresearch

Video: ट्रेनमध्येच तरुणीला चढली डान्सची नशा, “दिलनशी दिलनशी” गाण्यावर थिरकली, नेटकरी म्हणाले, “पुढच्या स्टेशनला उतर आणि…”

तरुणीचा दिलनशी दिलनशी गाण्यावरील भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: ट्रेनमध्येच तरुणीला चढली डान्सची नशा, “दिलनशी दिलनशी” गाण्यावर थिरकली, नेटकरी म्हणाले, “पुढच्या स्टेशनला उतर आणि…”
तरुणीने भन्नाट डान्स केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (image-social media)

सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी लोक काय करतील, याचा नेम राहिला नाही. भर रस्त्यात भन्नाट डान्स करुन लोकांचं मनोरंजन करण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आयटम सॉंगवर थिरकताना अनेक तरुण-तरुणी रिल्सच्या माध्यमातून दिसत आहेत. एका तरुणीचा दिलनशी दिलनशी गाण्यावरील भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आताच्या युवा पिढीला गाण्यांच्या तालावर ठुमके लगावण्याचं वेडंच लागलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या बाजूला जाऊन दिलनशी दिलनशी करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

ट्रेनमध्ये अनेक जण काही ना काही कुरापती करत असतात आणि व्हिडीओ बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करतात. एका तरुणीलाही ट्रेनच्या डब्यात नाचण्याचा मोह आवरला नाही. तरुणीने जबरदस्त ठुमके लगावत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून नेटकऱ्यांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. @seemakanojiya87 या युजरने शेअर केलेला या व्हिडीओला तब्बल ३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – Video: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”

इथे पाहा व्हिडीओ

आशिक बनाया आपने या सिनेमातील गायक केके यांच्या दिलनशी गाण्यावर तरुणीने केलेल्या डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तरुणीच्या किलर अदांमुळे नेटकऱ्यांचाही व्हिडीओ पाहण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तिनं केलेला डान्स अफलातून असून नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहण्याला पंसती दर्शवली आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं, “पुढच्या स्टेशनला उतर आणि पुन्हा परत येऊच नको”. दिदी तुझा डान्स करण्याचा आत्मविश्वास माझ्या मार्कशीटपेक्षाही जास्त आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 19:39 IST

संबंधित बातम्या