सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय ‘फायर पाणीपुरी’चा VIRAL VIDEO, पाहून तुम्ही व्हाल हैराण!

फायर पाननंतर आता ‘फायर पाणीपुरी’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आता तुम्ही विचार करत असाल की दुकानदाराने पाणीपुरीच्या पाण्यात कशी काय आग लावली असेल? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तर कपाळाला हात लावला.

Fire-Golgappa-viral-video
(Photo: Instagram/ foodiekru)

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार आणि थरारक असतात. तर काही व्हिडीओंच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली असते. काही व्हिडीओंमध्ये खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थांची माहिती देण्यात आलेली असते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा अशाच पद्धतीचा आहे. फायर पाननंतर आता ‘फायर पाणीपुरी’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आता तुम्ही विचार करत असाल की दुकानदाराने पाणीपुरीच्या पाण्यात कशी काय आग लावली असेल? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तर कपाळाला हात लावला. कारण एक काळ होता जेव्हा लोक पाणीपुरी खाताना आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये लोक पाणीपुरीवर आग लावून खात आहेत. हे पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अहमदाबादमधला असल्याचं सांगण्यात येतंय. काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी रस्त्यावर उभी आहे. एक विक्रेता पाणीपुरीला लायटरच्या मदतीने आग लावतो. हातात पडकलेली ही ‘फायर पाणीपुरी’ तो बाजुला उभी असलेल्या मुलीच्या तोंडात देतो. हे सारं चित्र पाहून तुम्ही हैराण व्हाल. यापुर्वी सोशल मीडियावर ‘फायर पान’चा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या ‘फायर पाणीपुरी’चा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकीत होऊ लागले आहेत.

एका फूड ब्लॉगरने स्वतः या विक्रेत्याच्या स्टॉलला भेट देत ‘फायर पाणीपुरी’ जगासमोर आणली. ‘foodiekru’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. २६ नोव्हेंबर रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत २ लाख २३ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तसंच ८ हजार ४०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. ही संख्या आता सातत्याने वाढत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL : सॉक्स सुकवण्यासाठी किवी टीमने शोधला हा देसी जुगाड ! फोटो झाला व्हायरल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

‘फायर पाणीपुरी’चा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी कपाळाला हात लावला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘माणूस तोंड जळेल.’ कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘हे स्ट्रीट फूडचे विक्रेते प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने टोमणा मारत लिहिलं की, ‘आगीत जळून गेलेली काळी शेव भारी दिसतेय.’ काही युजर्समा पाणीपुरीचा हा व्हिडीओ खूपच मजेदार वाटला. नेटकऱ्यांनी तर कमेंटमध्ये अॅडमिनला या विक्रेत्याचा पत्ता विचारलं आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl eats fire golgappa in viral video from ahmedabad awful says internet google trending today prp

Next Story
Viral Video: उलट्या हातावर इतकी अंडी ठेवत केला विश्वविक्रम; नेटकरीही चक्रावले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी