scorecardresearch

कॉपी करण्याच्या नादात थेट चिखलाच्या डबक्यात कोसळली मुलगी..; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

कधी कधी दुसऱ्यांची कॉपी करण्याच्या नादात आपणच स्वतः संकटात सापडतो. अनेकदा आपण आपलंच हसू करून घेतो. नेमका असाच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणं कठिण होईल.

girl-fell-into-the-mud-filled-pit-viral-video
(Photo: Instagram/ lustigejoke)

मुलांना खेळण्या-बागडण्याची भारी हौस असते आणि ते प्रत्येक गोष्टीत खेळण्यासाठी नव नवे पर्याय शोधत असतात. मुला-मुलींचे असे बरेच व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील, ज्यामध्ये मुले कधी खोडा काढताना दिसून येतात तर कधी खेळताना दिसतात. त्याचबरोबर काही व्हिडीओ असेही असतात जे पाहिलं की डोळे पाणावतात. काही मजेदार व्हिडीओ देखील लोकांना पहायला आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लहान मुलं खेळत आहेत, पण नंतर असं काही घडतं, ज्याची अपेक्षा कोणीच केली नसेल. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला असून तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन मुले दोरीच्या सहाय्याने खेळत आहेत. यात एक व्यक्ती त्यांना मदत देखील करतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगा दोरीच्या साहाय्याने लटकून मातीने भरलेला खड्डा सहज पार करतो. यानंतर एक मुलगीही अशाच प्रकारे दोरीला लटकून खड्डा ओलांडण्याचा प्रयत्न करते, मात्र सुरुवातीला तिचा तोल बिघडतो आणि ती चिखलाने भरलेल्या खड्ड्यात पडते. तिचं संपूर्ण शरीर चिखलाने भरतं. त्यानंतर ती तिथून उठते आणि निघून जाते.

आणखी वाचा : पाकिस्तानी तरुणीचा भाजी बनवतानाचा नवा VIRAL VIDEO, लोक म्हणाले, “तुम्ही फक्त व्हिडीओसाठी काम करता का?”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडल्या आणि फोन अनलॉक करून १८ लाखांचा चूना लावला

हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर lustigejoke या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ६४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर २,४०० हून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत, एका यूजरने लिहिले आहे की, ‘सुपरव्हिलनचा जन्म इथे झाला’, तर दुसर्‍या युजरने जाडजुड मुलांच्या बाबतीत असं नेहमीच होतं, अशी कमेंट केली आहे. याशिवाय अनेक युजर्सनी मुलाच्या लठ्ठपणाबद्दल कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओवरील प्रतिक्रिया वाचण्यासाऱख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl fell into the mud filled pit due to the rope swing funny video viral google trending video today prp