scorecardresearch

एखाद्या खेळण्याप्रमाणे ही चिमुरडी खेळतीये सापाशी! आश्चर्यचकित करणारा Video Viral

आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका महाकाय सापासोबत खेळताना दिसत आहे.

Little Girl With Snake
व्हायरल व्हिडीओ (फोटो: snake._.world / Instagram)

लहान मुलांना नक्कीच समाज नसते. कधी कधी तर ते असे काही करतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं. सापाचे नाव ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो पण, एक लहान मुलगी असे काही करते की क्षणभर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. सोशल मीडिया म्हणजे रोज काहीतरी व्हायरल होत असते. येथे विचित्र घटनांचे व्हिडीओ आपले लक्ष वेधून घेतात. आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका महाकाय सापासोबत खेळताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुमचे मन क्षणभर सुन्न होऊन जाईल. कारण येथे ज्याप्रकारे ती लहान मुलगी सापासोबत वागत आहे ते थक्क करणारे आहे. सध्या हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचानक दिसलेल्या सापापासून पळून जाण्याऐवजी ती त्याची शेपटी पकडून त्याला ओढू लागते. त्याचवेळी साप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण ही चिमुरडी न घाबरता सापाशी खेळू लागते.

(हे ही वाचा: लहान मुलापासून जीव वाचवण्यासाठीचे सापाचे सर्व प्रयत्न अयशस्वी; धक्कादायक Video Viral)

(हे ही वाचा: व्यायामासाठी देसी जुगाड! लाकडापासून बनवली विजेशिवाय चालणारी ट्रेडमिल मशीन; Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रमवर पोस्ट करण्यात आला आहे. “तुम्हाला काय वाटत?’ असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ अनेक हजार लोकांनी बघितलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl is playing with snake like a toy shocking video viral ttg

ताज्या बातम्या