Girl Jumps Into River After Fight Shocking Viral Video Goes Trending: सोशल मीडियाच्या अफाट जगात नेमकं कधी, काय आणि किती धक्कादायक पाहायला मिळेल याचा काहीच नेम नाही. कधी विनोदी, तर कधी अंगावर काटा आणणारे प्रसंग समोर येतात. सध्या असाच एक हृदयाची धडधड वाढवणारा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांना अक्षरशः स्तब्ध करून टाकत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसतं की, एका घाटावर एक तरुणी आणि दोन तरुण शांतपणे बसलेले असतात. वातावरण अगदी निवांत आणि सामान्य वाटत असतानाच अचानक काहीतरी घडतं. एका किरकोळ वाटणाऱ्या वादातून परिस्थिती झपाट्यानं बदलते. काही क्षणांतच त्या तरुणीचा संताप अनावर होतो… आणि पुढच्याच क्षणी ती उठते आणि कोणताही विचार न करता, थेट नदीत उडी घेते.

क्षणभर सगळेच थबकून जातात. पाण्यात पडलेली तरुणी हळूहळू पुढे सरकताना दिसते आणि पाहणाऱ्यांच्या हृदयाची धडधड वाढते. ती खरोखर बुडते आहे का? की हा फक्त एखादा अतिरेक? उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडते आणि वेळ न दवडता, काही जण तत्काळ नदीत उडी घेऊन, त्या तरुणीला वाचविण्यासाठी तिच्याकडे धाव घेतात.

थरारक क्षणांनी भरलेला हा प्रसंग पाहताना प्रत्येक सेकंद जणू थांबल्याचा भास होतो. अखेर त्या तरुणीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश येतं आणि तेव्हा उपस्थित लोक सुटकेचा नि:श्वास सोडतात. मात्र, हा सगळा प्रकार नेमका काय होता, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा प्रसंग खरा वाटतो; तर अनेक जण हे दृश्य ‘स्क्रिप्टेड’ असल्याचा दावा करीत आहेत. “व्हिडीओ शूट करणाऱ्याचे टायमिंग इतके अचूक कसे,” असा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे. तर दुसऱ्याने, “फक्त रील बनवण्यासाठी लोक कोणत्याही टोकाला जाऊ शकतात,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

व्हिडीओ शेअर करताना तो वाराणसीतील एखाद्या घाटावरचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या व्हिडीओमागचं सत्य अद्याप गूढच आहे.

हा थरारक प्रसंग पाहून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमतो ही खरोखरच भावनेच्या भरात घेतलेली धोकादायक कृती होती की फक्त व्हायरल होण्यासाठी रचलेला नाट्यपूर्ण डाव? सत्य काहीही असो; पण हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही!

येथे पाहा व्हिडीओ