girl makes worlds Largest Cake Dress Out of Cake Recorded in the guinness Book viral video | Loksatta

मुलीने चक्क केकपासून बनवला ड्रेस; गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या केक ड्रेसचा Video एकदा पाहाच

केकचा ड्रेस परिधान केलेल्या महिलेचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे

Guinness World Record
एका बेकरने जगातील सर्वात मोठा 'केक ड्रेस' बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. (Photo : Instagram)

स्वित्झर्लंडमधील एका बेकरने जगातील सर्वात मोठा केकचा ड्रेस बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने कॅप्शनंध्ये लिहिलं आहे की “नताशा कॉलिन किम फाहली फोकसने स्वीटकेक्सपासून १३१.१५ किलो वजनाचा सर्वात मोठा घालण्यायोग्य केक ड्रेस तयार केला आहे”. शिवाय हा ड्रेस परिधान केलेल्या महिलेचा एक व्हिडीओदेखील इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. स्वीटीकेक्सच्या नताशा कॉलिन किम फाहली फोकसने हा केक स्वित्झर्लंडमध्ये प्रदर्शकासमोर घालून दाखवला. या केक ड्रेसचे वजन तब्बल १३१.१५ किलो होते. स्वीटकेक ही केक बनवणारी बेकरी आहे. स्वीटकेकची स्थापना २०१४ मध्ये नताशाने केली होती.

फॅशन शो दरम्यान दाखवला केकचा ड्रेस –

नताशा कॉलिन ही स्वीटकेक्स नावाची बेकरी चालवते, जी कस्टम केक बनवते. याच बेकरीत तिने भलामोठा केकचा ड्रेस बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. ‘स्विस वर्ल्ड वेडिंग फेअर’ दरम्यान हा रेकॉर्ड बनला. केक आयोजित एका फॅशन शोच्या समारोपानंतर केकचे प्रदर्शन करण्यात आले होते. GWS च्या मते, लेयर्ड केक ड्रेसला लग्नाच्या पोशाखाच्या पारंपारिक पैलूंसह, रॉयल आइसिंगने स्वीटहार्ट नेकलाईन आणि फुलाने सजवला होता.

हेही पाहा- मुक्या जीवाने राखली भाकरीची जाण, आजारी आजीच्या भेटीला आलेल्या वानराचा हृदयस्पर्शी Video पाहाच

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ –

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ४ मिलियनहून अधिक वेळा पाहिला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकजण केक कुठे आहे असा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत.

हेही पाहा- IND vs AUS आधी सिराज, उमरान मलिकचा हॉटेलमधील ‘हा’ Video पाहून फॅन्स भडकले; म्हणाले, “माज पाकिस्तानात..”

एका नेटकऱ्याने “केक कुठे आहे?”… “आणि मुलीने तो घातला आहे” असं आश्चर्यचकित होऊन विचारं आहे. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, एवढा मोठा केकही बनवला जाऊ शकतो यावर माझा विश्वास बसत नाही” तर आणखी एकाने “व्हिडीओतील महिलेला पाहून खूप प्रभावित झाले की ती तिच्या खांद्यावर इतके वजन घेऊन चालू शकली.” अशा अनेक कमेंट लोक या व्हिडीओवर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:57 IST
Next Story
लैंगिक छळाचे प्रमाण वाढले! Metaverse मधील गुन्हेगारांच्या विरुद्ध शेवटी पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, आतापासून..