Viral video: लावणी हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे, जो संगीत, नृत्य आणि गीत यांचा सुंदर संगम आहे. पारंपरिकरित्या महिलांनी सादर केलेल्या या नृत्यात आता पुरुषही मोठ्या उत्साहाने सहभाग घेताना दिसतात. घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर सादर होणाऱ्या या नृत्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. सोशल मीडियावरही लावणीला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक जण विविध गाण्यांवर नृत्य सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर एका तरुणीनं जोशात लावणी सादर केली आहे. तिच्या उत्स्फूर्त नृत्यशैलीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहेत. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. मरीन ड्राइव्हवर फिरायला आलेली लोकही कौतुकाने त्यांना पाहत होती. या अप्रतिम सादरीकरणामुळे नेटकऱ्यांनी त्यांची भरभरून प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यशैलीला मिळत असलेला हा नवा रंग पाहून अनेक जण आनंद व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ

लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा लावणी ही महिलांकडून सादर केली जायची पण कालांतराने पुरुषांनी सुद्धा आवडीने लावणी सादर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. priya_dnyaneshwar_naskar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लावणीच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.’लय भारी’, ‘खूप मस्त’, ‘भावा मला तुझा व्हिडिओ खूप आवडला. एकच नंबर’, ‘अमेझिंग’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने तर, ‘अजुन एकदा परत मरिन ड्राइव्हवर डान्स करा. असं म्हणत पुन्हा एकदा मरिन ड्राइव्हवर डान्स करण्याची विनंती केली आहे.