ladies group dance marathi video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एका तरुणीनं भन्नाट लावणी करुन सगळ्यांना घायाळ केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे.

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच एका तरुणीची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे

या तरुणीनं मराठी गाण्यावर “काखेत कळसा, गावाला वळसा कशाला? तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला” डान्स केला आहे. विशेष म्हणजे हा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणीनं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. यावेळी ती फक्त लावणी करत नाहीयेत तर तिच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या तरुणी आपले हावभाव बदलत आहेत. या तरुणीचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणीनंही असंच सादरीकरण केलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ujjwala_bodake या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, ताई भारीच, तर आणखी एकानं, “पोरीनं पार घायाळ केलं..किती पाहिले तरी मन भरत नाहीये.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.