Valentine Week Viral Love Story : व्हॅलेंटाईन वीक सुरु असून प्रेमीयुगुल मनातील प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुणीतरी आपला जीवनसाथी व्हावा अन् आयुष्याची प्रवासात प्रेमळ भावनांचा वर्षाव व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मनात दाटून आलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक तरुण १४ फेब्रुवारीची वाट पाहतात. आता या लव्हबर्ड्सची प्रतिक्षा जवळपास संपली आहे. कारण उद्याच व्हॅलेंटाईन डे असल्याने प्रेमीयुगुलांची प्रेम व्यक्त करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण एका तरुणाने व्हॅलेंटाईन डे आधीच एका मुलीला वर्गातच लाल गुलाब घेऊन प्रपोज केला. पण त्या मुलीने तरुणाला आयुष्यभरासाठी चांगलीच अद्दल घडवली. प्रेम व्यक्त करणारा दिवस नसनाही तो तरुण वर्गात हिरोगीरी करायला गेला अन् स्वत:ची फजिती करुन बसला. हा संपूर्ण प्रकार वर्गातील विद्यार्थ्यांनी कॅमेरात कैद केला असून व्हिडी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाल रंगाचा टी शर्ट घातलेला एक विद्यार्थी हातात गुलाबाचं फुल घेऊन मुलीच्या बाजूला उभा असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तो मुलगा प्रपोज करण्याच्या इराद्यात असताना शेजारी असलेले विद्यार्थी त्याचा व्हिडीओ काढत असतात. मुलगी समोर दिसताच तो तरुण हातात असलेला गुलाब पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेल्या मुलीनं गुलाबाचा फुल हातात घेऊन तोडल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मुलीने प्रेमाला नकरा देताच नाराज झालेला मुलगा गुलाबाचं फुल तिच्या अंगावर फेकून देतो. त्यानंतर तरुणीचा पारा आणखी वाढतो आणि हातात असलेली बॅग थेट त्या मुलाच्या तोंडावर फेकते. पण तो मुलगा बॅगेच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करताना व्हिडीओत दिसत आहे. नक्की वाचा - यशस्वी होणं इतकं सोपं असतं? शिकारीसाठी आलेल्या वाघाला त्या प्राण्याने पार दमवलं…प्राण्यांच्या रेसचा Video व्हायरल इथे पाहा व्हिडीओ https://twitter.com/gharkekalesh/status/1622284792497684481?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1622284792497684481%7Ctwgr%5Ecba8d1b34a2ccbf01b89785902c56ea0c8d09e38%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fodishatv.in%2Fnews%2Fviral%2Fboy-proposes-to-girl-inside-classroom-watch-both-in-action-mode-after-rejection-196759 घर के कलश नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने १ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हॅलेंटाईन डेला खास सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणवर्ग दिवसेंदिवस भन्नाट गोष्टी करताना दिसत आहे. प्रेमाची घाई झालेल्या लोकांची फजिती झाल्याचे व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. लाईफ पार्टनरला खास गिफ्ट देण्यासाठी प्रेमीयुगुल वेगवेगळे गिफ्ट्सही खरेदी करत आहेत. पण ज्यांना प्रेमात नकार मिळाला आहे, त्यांची मात्र निराशा झाली असल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.