"पतली कमरीया मोरे हाय हाय", चक्क स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून तरुणीचा भन्नाट डान्स , तरुणांनाही वेड लावलं, Video होतोय Viral | Loksatta

“पतली कमरीया मोरे हाय हाय”, चक्क स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून तरुणीचा भन्नाट डान्स , तरुणांनाही वेड लावलं, Video होतोय Viral

‘पतली कमरीया मोरे हाय हाय’ या भोजपुरी गाण्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

“पतली कमरीया मोरे हाय हाय”, चक्क स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून तरुणीचा भन्नाट डान्स , तरुणांनाही वेड लावलं, Video होतोय Viral
बाईक सवारी करताना तरुणीने भन्नाट डान्स केला.(image-social media)

‘पतली कमरीया मोरे हाय हाय’ या भोजपुरी गाण्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हिंदी गाण्यावर थिरकणाऱ्या अनेकांना तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, पण या भोजपुरी गाण्यावर तरुणीने स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून केलेला भन्नाट डान्स तरुणांना वेड लावून गेला. महामार्गावर दुचाकी चालवताना सतर्क राहावं लागतं. पण या तरुणीने दुचाकीवर उभं राहून चक्क डान्स केला. तरुणीचे ठुमके पाहून मागच्या दिशेनं दुचाकीवरून येणाऱ्या तरुणांनाही डान्स करण्याचा मोह आवरला नाही. भन्नाट डान्सचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

रस्त्यावरून दुचाकी चालवताना एका तरुणीने सीटवर उभं राहून भोजपुरी गाण्यावर डान्स केला. हा डान्स पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तरुणीनं खूप मोठा धोका पत्कारून बाईकवर डान्स केला. जबरदस्त अंदाजात लगावलेले ठुमक्यांनी थेट तरुणांच्या हृदयाला स्पर्श केला. गाण्याचे बोल ऐकून तरुणीने जो काही डान्स केला, ते पाहून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनीही डान्स करण्याचा आनंद लुटला.

नक्की वाचा – भर वर्गातच शिक्षिकेचा भन्नाट डान्स, विद्यार्थ्यांनाही नाचवलं ; शाळेतील Viral Video इंटरनेटवर गाजला

इथे पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं, अप्रतिम, तू खूप मस्त डान्स करत आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं, हा मुर्खपणा आहे आणि धोक्याची सवारी आहे. तसेच अन्य एकाने कमेंट करत म्हटलं, हे खूप चांगलं आहे, पण ताई काळजी घे, तुझा डान्स खूप चांगला आहे, पण हे धोकादायक आहे, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. तरुणीच्या या डान्सचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. जराही अपघाताची भीती नसणाऱ्या या तरुणीने धोकादायक डान्स करून अनेकांना थक्क केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:37 IST
Next Story
पाळीव कुत्र्याच्या दिर्घायुष्यासाठी भलता नवस, सुरक्षेसाठी बकऱ्याचा बळी