scorecardresearch

स्टंट करण्याच्या नादात तरुणीने कॅमेरामॅनवरच चढवली स्कूटी; Video Viral

व्हिडीओ बघून नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत की असा स्टंट करायची काय गरज होती. आत्तापर्यंत ७५ हजाराहून जास्त लोकांनी बघितला आहे.

Girl bike Stunt Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: bboyz.sbk / Insatgram)

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. अनेकदा खतरनाक स्टंटचे व्हिडीओ तर सहसा बघितले जातात. असाच एक स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तरुणी स्कुटी चालकाचा आहे.

स्कुटीवरचा स्टंट

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला बघून असं वाटत की तरुणीच्या स्टंटवर हसव की हा स्टंट का केला म्हणून तिला समजावं. कारण या स्टंटमुळे गंभीर दुखापतही होऊ शकते. व्हिडीओमध्ये दिसू शकत की दोन तरुणी स्कुटीवर बसून स्टंट परफॉर्म करायचा प्रत्यन करत होते. या दरम्यान तरुणी असं काही करते की संपूर्ण स्टंट बिघडतो.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

नक्की काय होत?

व्हिडीओमध्ये दिसून येत की कॅमेऱ्याच्या समोर स्टंट परफॉर्म करण्यासाठी दोन्ही तरुणी आपापल्या स्कुटीवर तयार होतात. या नंतर कॅमेरामॅन गो असं म्हणतो. तेव्हा एक तरुणी आपली स्कुटी उचलून स्टंट करू लागते. तेवढ्यात तिच्या स्कुटीचा बॅलन्स बिघडतो आणि स्कुटी कॅमेरामॅनला जाऊन आदळते. स्वतः ती तरुणीही पडते.

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

(हे ही वाचा: स्वत:ला आरशात पाहून घाबरून पळून गेला कुत्रा, मजेशीर video viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ बघून नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत की असा स्टंट करायची काय गरज होती. व्हिडीओ इस्टांग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत ७५ हजाराहून जास्त लोकांनी बघितला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl scooty mounts on cameraman video viral ttg

ताज्या बातम्या