scorecardresearch

VIRAL VIDEO : घराच्या छतावर लपून डान्स व्हिडीओ बनवत होती, अचानक झालं असं काही की…

या दोघी डान्स व्हिडीओ बनवण्यात मग्न झालेल्या असताना अचानक असं काही तरी घडतं की त्या दोघी तिथून पळून जातात. असं नेमकं काय घडतं ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.

Girls-Dance-Video
(Photo: Instagram/ memes.bks)

आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय काय करतात. सध्या तर अनेकजण रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात असतात. याच नादात अनेकदा काही किस्से असे घडतात की ते पाहून कधी कधी हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली आपल्या घराच्या छतावर जाऊन डान्स व्हिडीओ बनवत होत्या. या दोघी डान्स व्हिडीओ बनवण्यात मग्न झालेल्या असताना अचानक असं काही तरी घडतं की त्या दोघी तिथून पळून जातात. असं नेमकं काय घडतं ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कडक उन्हातही मोठ्या जोशात डान्स करतेय. तर दुसरी मुलगी हातात मोबाईल पकडून त्या मुलीचा डान्स व्हिडीओ शूट करतेय. या व्हिडीओमध्ये डान्स करणारी मुलगी इतके अप्रतिम डान्स स्टेप्स करतेय की पाहणारे केवळ पाहतच राहतील. जबरदस्त ठुमके देत ही मुलगी आपला डान्स व्हिडीओ बनवण्यात मग्न झालेली. डान्स करता करता या दोघी मुलगी छतावर असं काही पाहतात की त्यानंतर या दोघी जणी तिथून पळून जातात.

आणखी वाचा : केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावला हत्ती, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट अन् धापकन खाली कोसळला…

हा व्हिडीओ पाहण्यासाठी तसा फारच मजेदार आहे. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. memes.bks नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे तितकेच या व्हिडीओवरील कमेंट्सही मजेदार आहेत. “ताई लाजली का?”असं एका युजरने लिहिलंय. “आता लाजतेय, जेव्हा हा व्हिडिओ जगाला दिसतो तेव्हा लाज नाही वाटत का?” अशा प्रतिक्रिया सुद्धा या व्हिडीओवर लोकांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl secretly making dance video on the terrace suddenly she saw such thing then what happened next see funny prp