scorecardresearch

Video: छोट्या कुत्र्यासोबत खेळताना दिसली लहानगी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही होईल आनंद

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

Viral_Photo
Video: छोट्या कुत्र्यासोबत खेळताना दिसली लहानगी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही होईल आनंद

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. प्रवास करताना किंवा फावल्या वेळेत सर्वाधिक वेळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल केला जातो. यावेळी व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. काही व्हिडीओ इतके आवडतात की, शेअर करण्याचा मोह आवरत नाही. असे अनेक व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपण पाहिलं असेल की, लहान मुलांची पाळीव प्राण्यांसोबत लवकर गट्टी जमते. लहान सर्वाधिक वेळ पाळीव प्राण्यांसोबत घालवताना दिसतात. असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत एक लहान मुलगी तिच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. लहान पिल्लाला गार्डनमध्ये खेळवताना दिसत आहे. सर्वात आधी पिल्लाला घसरगुंडीवर चढवते. पिल्लही घसरगुंडीच्या दिशेने येतं आणि घसरून खाली येतं. यानंतर मुलीचा आनंद पाहण्यासारखा आहे. तर कुत्र्याचं पिल्लूही मुलीच्या आवतीभवती उड्या मारताना दिसत आहे. आयएफएश अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. व्हिडीओला आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया व्हिडीओखाली नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl seen playing with little dog viral video rmt