Girl Weird Dance On Mumbai Railway Platform Video : हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावं असं कोणाला नाही वाटत? त्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. कहर म्हणजे काही लोक इतक्या हास्यास्पद गोष्टी करतात, जे पाहून हसू तर येतेच; पण तितकाच रागही येतो. आता या तरुणीचाच व्हिडीओ पाहा ना. रील्सवर लाइक्स आणि व्ह्युज मिळविण्यासाठी ही तरुणी मुंबईतील रेल्वे फलाटावर बेजबाबदारपणे डान्स करतेय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तरुणीला यापूर्वीही रेल्वे पोलिसांनी अशा प्रकारचे व्हिडीओ न बनवण्याची तंबी दिली होती. मात्र, त्यानंतरही ही तरुणी असले नसते धाडस करतेय. त्याशिवाय ती इतर प्रवाशांनाही त्रास देतेय.

त्यात आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतही तरुणी डान्स करताना चक्क एका महिलेला जाऊन धडकते. त्यावर ती महिला संतापते आणि पुढे जे काही घडते, ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा.

young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
a woman was lucky was rescued by local people at waterfall shocking video goes viral
प्रत्येकवेळी कोणी जीव वाचवायला येणार नाही! नशीबवान होती महिला, मदतीला धावून आले लोक; पाहा थरारक VIDEO
Kitchen jugad video Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon kitchen tips
Kitchen Jugaad: पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
Shocking video land slide due to heavy rainfall scary video
VIDEO: एका निर्णयानं मृत्यूला रोखलं; भरधाव वेगात कार अन् समोरचा रस्ताच गेला वाहून, कार चालकानं काय केलं पाहाच
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”

मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मवर अक्षरश: लोळतेय तरुणी (Girl Dances On Mumbai Train Platform)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी मुंबईच्या स्थानकावर अतिशय विचित्रपणे नाचताना दिसत आहे. कधी ती जमिनीवर लोळतेय, तर कधी ती तिथे उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना धडक देत डान्सद्वारे विचित्र हालचाली करताना दिसतेय. याचदरम्यान, ती एका महिलेला येऊन धडकते. त्यावर ती महिला संतापते आणि तरुणीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात करू लागते. अनेक जण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे, असे म्हणत आहेत.

More Stories On Viral Video : एकमेकांचे कपडे पकडले मग बुक्के मारून…; मेट्रोत दोन पुरुषांची हाणामारी; VIDEO व्हायरल

“रीलच्या नावाखाली लोकांना त्रास देण्याचा हा प्रकार” युजर्सच्या कमेंट्स

मात्र, लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @seemakanojiya87 नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर एका युजरने कमेंट केली की, हे टॅलेंट नसून वेडेपणा आहे. तर इतरांचे म्हणणे आहे की, या तरुणीविरोधात पोलिसांत तक्रार करावी. कधी बघितलं, तर ती रीलच्या नावाखाली लोकांना त्रास देत राहते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, धक्का दिला ती मुलगी वाचली अन्यथा ती चालत्या ट्रेनखाली येऊ शकली असती.

दरम्यान, ही तरुणी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रेल्वेस्थानकावर नाचण्याच्या विचित्र हालचालींचे व्हिडीओ पोस्ट करीत असते. या व्हिडीओंद्वारे ती हास्यास्पद पद्धतीने डान्स करून इंटरनेटवर प्रसिद्ध झाली आहे. सीमाने यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत; ज्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.