Sairat Song Dance Video: सोशल मीडियाच्या विश्वात दररोज हजारो व्हिडीओ समोर येतात; मात्र काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहता क्षणीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एका सुंदर तरुणीने ‘सैराट’ चित्रपटातील अजय-अतुल यांच्या गाजलेल्या ‘याड लागलं’ या गाण्यावर सादर केलेला डान्स पाहून नेटकरी अक्षरशः भारावून गेले आहेत. तिच्या नजरेतील भाव, चेहऱ्यावरची मोहक स्मितरेषा व अंगातील सहज लय यांमुळे हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो.

या व्हिडीओमध्ये तरुणीचा डान्स केवळ स्टेप्सपुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक हालचालीतून ती गाण्याचा भाव जिवंत करताना दिसते. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नजाकत आहे. गाण्याच्या तालावर अचूक तिच्या स्टेप्स आणि कोणतीही दिखाऊपणा नसलेली सादरीकरणाची शैली प्रेक्षकांना भावून जाते. विशेष म्हणजे, ती कुठेही अतिरेक करत नाही; साधेपणातूनच ती आपली कला खुलवते, हीच तिची खरी ताकद ठरते.

डान्ससोबतच तिचे एक्स्प्रेशन्स हा या व्हिडीओचा मुख्य आकर्षणबिंदू ठरत आहे. डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव, गालावर उमटणारी हलकीशी स्मितरेषा आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीशी जुळणारे तिचे हावभाव यांमुळे व्हिडीओ अधिकच प्रभावी बनतो. अनेकांनी तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक भावनांची मनापासून स्तुती केली आहे.

या तरुणीचा लूकही तितकाच चर्चेत आहे. साध्या, पण आकर्षक पेहरावात ती दिसते. कोणताही जड मेकअप न करता, नैसर्गिक सौंदर्याने ती अधिक खुलून दिसते. तिच्या या साधेपणातच एक वेगळीच मोहकता दडलेली आहे, जी प्रेक्षकांना भुरळ घालते. तिच्यासोबत एक तरुणही डान्स करताना दिसतो; मात्र बहुतेकांचे लक्ष फक्त त्या तरुणीकडेच खिळून राहते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील kashuwuwuw या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काहीच दिवसांत लाखो व्ह्यूज मिळवीत तो प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक करीत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले, “सौंदर्य आणि अदा दोन्हीही कमालीच्या आहेत.” तर दुसऱ्याने लिहिले, “डान्स पाहून दिवसच सुंदर झाला.” काहींनी तर विनोदाने, “सोबतचा मुलगा पूर्णपणे दुर्लक्षित झाला,” अशी प्रतिक्रिया दिली.

एकंदरित, या तरुणीने आपल्या साध्या, पण प्रभावी सादरीकरणातून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या डान्समधील सहजता, चेहऱ्यावरील भाव व आकर्षक व्यक्तिमत्त्व यांमुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, ही तरुणी नक्की कोण आहे?

येथे पाहा व्हिडीओ