Girlfriend Boyfriend Stunt Video : मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर नेहमीच गप्पा गोष्टी रंगत असतात. याच मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये काही हौशी कपल्स असतात जे नेहमीच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रयत्नात अनेकदा त्यांची अशी काही फजिती होते की पाहून सर्वच हसू लागतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ते इतरांमध्ये आपलं वेगळं इंप्रेशन पाडण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण या स्टंटबाजीच्या नादात एकाला गंभीर दुखापत होते.
व्हिडीओत पाहू शकतात, एका घरात आनंदी वातावरण आहे, काही मित्र मैत्रिणी हॉलमध्ये बसून गप्पा गोष्टी करतायत. टीव्ही चालू आहे. यावेळी एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतो. तिला आधी उलटं खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करतो जे की, करणं थोडं अवघडच आहे. पण तरी तो ट्राय करतो.
असा स्टंट करण्यामागचा त्याचा हेतू कदाचित आपल्या मित्र मैत्रिणींना प्रभावित करणे किंवा हसवणे हा असावा. स्टंटच्या सुरुवातीला तो गर्लफ्रेंडला अगदी नीट खांद्यावर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, पण पुढच्याच क्षणी त्याचा तोल जातो.
गर्लफ्रेंडचं वजन त्याला उलट्या दिशेन बॅलन्स न करता आल्याने तो डगमगतो आणि तोल जाऊन खाली कोसळतो. पण खाली पडताना तो मागची भिंत आणि खिडकीवर आदळतो. इतकचं नाहीतर खांद्यावर बसलेल्या गर्लफ्रेंडचं वजनही त्याच्या मानेवर आणि मणक्यावर पडते. त्यामुळे त्याला मानेला गंभीर दुखापत होते.
हे इतके अचानक घडते की, उपस्थित असलेल्या त्याच्या मित्र- मैत्रिणींनाही क्षणभर काय घडलं समजू शकलं नाही, त्यामुळे ते या दोघांना पडताना पाहून जोरजोरात हसतात. परंतु पुढच्याच क्षणी त्यांना कळते की, प्रकरण गंभीर आहे.
कपलच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ एक्सवर @NeverteIImeodd नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
