Boyfriend Slap Girlfriend Video: कोणत्याही नात्यात प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा असतो. कारण प्रेम व्हायला वेळ लागत नाही पण ते टिकवायला लागतं. प्रेमात अनेक गोष्टी खटकतात, काही कारणांवरून भांडणंही होतात. पण याचवेळी समजूतदारपणा दाखवून समोरच्याची बाजू ऐकायची असते. आणि त्या व्यक्तीचा त्या परिस्थितही आदर करायचा असतो. पण हल्ली नात्यांना किंमतच उरली नाही आहे. लहान सहान गोष्टींवरून होणारी भांडण अक्षरश: मारहाणीपर्यंत जातात आणि जर ते भांडण एखाद्या कपलमध्ये होत असेल तर लोक मध्यस्थी करायलाही मागत नाहीत.
अनेकदा हे वाद टोकालाही जातात. कपलमध्ये भांडणं होणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात बॉयफ्रेंड भर रस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण करताना दिसतोय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या…
गर्लफ्रेंडला भर रस्त्यात मारहाण (Boyfriend Beats Girlfriend Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भररस्त्यात बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडचा छळ करत आहे. रस्त्यावर सगळ्यांसमोर तो तिच्यावर हात उगारून तिला मारत आहे. तो तिच्या कानाखाली मारून मग तिचे केस ओढतो. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @manatle_status00 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.६ मिलियन वर व्ह्यूज आले आहेत. तसंच “तिला मारण्यात कसली आलीय मर्दानगी, खरा पुरुषार्थ तर तिला जपण्यात आहे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिला मार खाताना व्हिडिओ काढण्यात कसली मर्दानगी खरी मर्दानगी तिला वाचवण्यात असावी”, तर दुसऱ्याने “अरे प्रत्येक ठिकाणी पुरुषच चुकीचा नसतो रे” अशी कमेंट केली. तर एकाने “ती मार खाऊन का घेत नाही’ अशी कमेंट केली.