Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणींच्या गृपच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जात असे. मात्र आता अनेकजण डान्सकडे स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गंभीरपणे पाहू लागले आहेत. डान्स शिकताना व्यक्ती स्वतःच्या भावनांना व्यक्त करू शकते आणि मन मोकळे करू शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मन अधिक आनंदी राहते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींनी एका गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ शेतातला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये २ तरुणी डान्स करताना दिसत आहे. या दोन्ही तरुणींनी साडी नेसली असून “बायला माझ्या नाद पाण्याचा गं” या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ v नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय पोरींचा नादच नाय! अशी प्रतिक्रिया दिलीय.