Viral video: सोशल मीडिया अनेक व्हिडीओच्या खजिना असून यावर मनोरंजनपासून धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच दोन तरुणीच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणींचं सौंदर्य आहे. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील त्यांच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही हिरोईनलाही विसराल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन्ही तरुणींनी साडी नेसून “चुनरी चुनरी” या गाण्यावर भन्नाट असा डान्स केला आहे. त्यांची अदा आणि भाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
त्या एक उत्कृष्ट डान्सर असल्याचं त्यांच्या भन्नाट डान्सवरुन वाटत आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणींच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ geeta.bagdwal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, वाहह काय नाचल्या राव, एकच नंबर, काय ती अदा काय तो डान्स..अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
