Viral video: सोशल मीडियावर रोजच अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळ्या महिलेचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. दोन हौशी मैत्रीणींचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच या खानदेशी गाण्यावर या दोन तरुणींनी डान्स केला आहे. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर तरुणींनी जबरदस्त डान्स केला आहे.
काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील artist.mrunali_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणींच्या नृत्यकौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे.
