Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच काही तरुणींच्या गृपच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत

“नाचू किती नाचू किती कंबर लचकली”, या जुन्या सुप्रसिद्ध गाण्याची आजकालच्या पिढीतह क्रेझ पाहायला मिळते. अशाच काही तरुणींचा याच गाण्याचावरचा जबरसदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच तरुणी साडी नेसून “नाचू किती नाचू किती कंबर लचकली” या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही कौतुक करेल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. हा व्हिडीओ पाहून एक क्षण असतं वाटतं की कुठल्या तरी चित्रपटातील सीन आहे. पण हा व्हिडीओ खऱ्या खुऱ्या आयुष्यातील आहे.  अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच या तरुणींचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ kshitija.vartak नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय अशी प्रतिक्रिया दिलीय. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या मुलींचे कौतुक केले आहे.