Viral Dance Video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी माणसांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये डान्सचे व्हिडिओ अनेकदा बघायला मिळतात. यातले काही व्हिडिओ असे असतात की जे तुम्ही वारंवार बघत राहता. अनेकांना तो व्हिडिओ शेअर करता. असाच एक डान्सचा सुंदर व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.
सोशल मीडियावर सध्या “लाल लाल कलरची बांगडी” हे गाणं चांगलंच ट्रेंडिंग आहे. संजू राठोडच्या या नव्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरील अनेक रील्सही व्हायरल झाल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही संजू राठोडच्या या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.. अशातच काही तरुणींनी या गाण्यावर चक्क नऊवारी साडी नेसून डान्स केला आहे.
सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून काही तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमात एकूण या ४ तरुणी भन्नाट डान्स करत आहेत. “लाल लाल कलरची बांगडी” गाण्यावर या तरुणींनी जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @maithili_baik या अकाउंटवर शेअर केला असून, यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
