परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थी काय काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. शिक्षकांच्या डोळ्यात धुळ फेकत हे विद्यार्थी कॉपीचे साहित्य घेऊन परीक्षा हॉलमध्ये पोहोचतात. यात कधी कोणी सॉक्समध्ये तर कधी कोणी लांब केसांमध्ये चिठ्ठ्या लपवून कॉपी करतात. यात काही विद्यार्थी डेस्क, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स यातही कोणाला समजणार नाहीत अशापद्धतीने प्रश्नांची उत्तरे लिहून आणतात. पण, आजवर आपण परीक्षेत कॉपी करण्यात मुलंच पटाईत असल्याचे पाहिले असेल; पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चक्क मुली चलाखीने कॉपी करत असल्याचे दिसत आहेत. या मुलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
परीक्षेत कॉपी करण्याची नवी युक्ती
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलींचा एक ग्रुप परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी उत्तीर्ण होण्यासाठी कॉपीची व्यवस्था करत आहे. या सर्व मुली चक्क त्यांनी अंगावर घातलेल्या कुर्त्याच्या आतील बाजूस पेनाने काही प्रश्नांची उत्तरं लिहून घेत आहेत. मोबाईलमध्ये प्रश्नांच्या उत्तरांचा त्यांनी फोटो काढून घेतला आहे आणि त्यानंतर ती उत्तरं सरळ कुर्त्याच्या आतल्या बाजूस लिहित आहेत. या सर्व घटनेच्या वेळी त्यांच्या एका मित्राने व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात परीक्षेत कॉपी करण्यासाठी तरुणींनी केलेला जुगाड पाहून अनेकांना त्यांच्या शाळा आणि कॉलेजातील दिवस आठवले, तर अनेकांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
परीक्षेत कॉपी करण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का?
हा व्हिडीओ @sathvika_chirunagula नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही कधी हा प्रयत्न केला आहे का? कोणाला टॅग करायचे हे तुम्हाला माहीत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यात काही युजर्सनी परीक्षेदरम्यान अशाप्रकारे कॉपी करण्यात पटाईत असलेल्या त्यांच्या मित्रांना हा व्हिडीओ टॅग केला आहे. तर काहींनी गमतीत हे विद्यार्थी किती हुशार आहेत असे म्हटले आहे. यावर एकाने गमतीत लिहिलेय की, जेव्हा परीक्षेत आपण लिहून घेतलेल्या कॉपीमधील उत्तरांसंबंधित प्रश्न येत नाहीत, तेव्हा खूप वाईट वाटतं. यावर काही युजर्स परीक्षेत शिक्षकांना विद्यार्थ्यांचे कपडेही नीट तपासा असा सल्ला देत आहेत. पण, या व्हायरल व्हिडीओवर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls highly creative way to cheating in exams video goes viral on social media sjr