आतापर्यंत बारच्या बाहेर दार फक्त मुलांचाच राडा होत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. चक्क बारच्या बाहेर दोन मुली आपापसात भिडल्याचं पहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या भयंकर भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हा वाद साऱ्यांचाच औत्सुक्याचा विषय बनलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या भांडणाचा व्हिडीओ लखनऊ शहरातला आहे. गेल्या २५ ऑक्टोंबर रोजी लखनऊ इथल्या बारबिरवा चौकाजवळील स्काय हिल्टन बारच्या बाहेर ही घटना घडलीय. आधी मुलींवरुन मुलांची भांडण व्हायची मात्र आता जमाना बदलाय आता मुली मुलांवरुन भांडण करायला लागल्यात. आपल्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये बसलेल्या बाहेर काढत लाथा बुक्क्यांनी जोरदार मारताना दिसत आहे. कधी रस्त्यावर ओढून आणत तर कधी कारवर आदळत या मुली एकमेकींना मारत होत्या. या मारहाणीत एक तरूण देखील दिसून येतोय. हा तरूण त्या दोघींचा प्रियकर असल्याचं सांगण्यात येतंय. काही लोकांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा उपयोग झाली नाही आणि या मुली फ्रीस्टाईलने हाणामारी करतच राहिल्या. या मारहाणीत एक्स गर्लफ्रेंडची अवस्था गंभीर झाली आणि तिला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आलं.
तर प्रकरण असं आहे की, स्काय हिल्टन बारच्या जवळ रॉबिन हा तिथे त्याच्या दोन्ही मैत्रिणीसोबत पोहोचला. त्याच ठिकाणी त्याची एक्स-गर्लफ्रेंड सुद्धा उभी होती. रॉबिनसोबत कारमध्ये असलेल्या दोन्ही मैत्रिणींनी या एक्स गर्लफ्रेंडला मारहाण करण्यास सुरूवात केली. या दोन्ही मैत्रिणी दारूच्या नशेत असल्याचं बोललं जातंय. या दोन्ही मैत्रिणींपैकी एक मुलगी ही रॉबिनची सध्याची गर्लफ्रेंड होती. या मारहाणीत एक्स-गर्लफ्रेंड गंभीर जखमी झाली आणि रस्त्यावरच बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
या प्रकरणात एक्स-गर्लफ्रेंडने आरोप केला आहे, की एक तरूणाने तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर आपल्या मैत्रिणींकडून तिला मारहाण करून घेतली. या घटनेनंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पंधरा दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या सोमवारी ही घटना घडल्यानंतर तिथल्या नागरिकांनी ही फ्रीस्टाइल हाणामारी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर मंगळवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. सध्या या प्रकरणी तरूण रॉबिनला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.