“महागाई किती वाढली आहे? सर्व काही किती महाग झाले आहे” हे वाक्य नेहमी आपल्या कानांवर पडत असते. आजच्या दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये १९५० पासून २०२३ पर्यंतच्या सोन्याचे भाव दिले आहेत. १९५० पासून २०२३ पर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये जो बदल झाला आहे तो खरंच धक्कादायक आहे. इंस्टाग्रामवर ही पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात महागाई किती झपाट्याने वाढली आहे याची झलक या फोटोतून पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९९ रुपयांपासून ते ६० हजार रुपयांवर पोहोचला सोन्याचा भाव
इंस्टाग्रामवर pehla.pyar नावाच्या अकाऊंट ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये १९५० पासून २०२३ पर्यंत, गेल्या ७३ वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेले बदल दर्शविले आहे. या फोटोनुसार,” १९५० मध्ये सोन्याची किंमत ९९ रुपये होती, जी ऑगस्ट २०२३ मध्ये वाढली ६०,३०० रुपयांवर पोहचली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होत आहे, पण वर्षानुवर्षे वाढणाऱ्या दराचा हा तक्ता पाहून लोकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – चीनचा अनोखा जुगाड! आता विद्यार्थ्यांना शाळेत झोपता येणार, बनवले खास ‘डेस्क’; पाहा व्हायरल व्हिडीओ

अनेक लोकांची झाली निराशा

या पोस्टला फक्त दोन दिवसामध्ये ५५ हजारपेक्षा जास्त लोकांनी पसंती दिली आहे आणि कित्येकजण कमेंट करत आहे. सोन्याचे वाढलेले भाव पाहून अनेक लोक निराश झाले आहेत कारण सोन्यामध्ये गुंतवणूक न केल्याचा त्यांना पश्चाताप होत आहे. जर तेव्हा सोन्यात गुंतवणूक केली असती तर आज कित्येकजण मालामाल झाले असते. एकाने लिहिले,”२०१९ आणि २०२०मधील फरक बघा.” कारण या पोस्टनुसार, २०१९मध्ये सोन्याची किंमत ३५ हजार प्रति ग्राम होती आणि २०२० मध्ये ४८ हजार प्रति ग्रॅम झाली.

हेही वाचा – “आईवर ओरडू नका”; पालकांच्या भांडणात चिमुकलीने घेतली धाडसी भूमिका, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

तर दुसऱ्याने लिहिले की, हे याद पाहून पश्चताप होत आहे. मी २०१८-२०१९मध्ये सोने का नाही खरेदी केले. तिसऱ्याने लिहिले की,”१९५० मध्ये मी असतो तर आज मालामाल झालो असतो.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold golden journey from rs 99 to rs 60 300 per 10 grams in 73 years post gone viral on social media snk
First published on: 28-11-2023 at 17:12 IST