Gold Mine Viral Video : मध्य आफ्रिकन देश रिपब्लिक ऑफ कांगो येथून एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून अजूनही माणूसकी अजूनही जिवंत आहे असा प्रत्यय आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. सोन्याच्या खाणीत कामगार काम करत असताना अचानक सोन्याची खाण कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी कोसळलेल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेची ही थरारक दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
ही घटना काँगोच्या दक्षिण किवू प्रांतात असलेल्या एका खाणीत घडली आहे. दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे सोन्याच्या खाणीत काही कामगार काम करत होते. या दरम्यान अचानक ही सोन्याची खाण कोसळते. खाण इतक्या वेगाने कोसळली की, कामगारांना बाहेर पडताही येत नाही आणि खाणीत काम करणारे ९ कामगार आतमध्येच खाणीच्या ढिगाऱ्याखाली अडकतात. यावेळी यातून बचावलेला कामगार स्वत:च्या जिवाची बाजी लावत अडकलेल्या कामगारांना वाचवायला सुरुवात करतो. तो मातीचा ढिगारा हाताने बाजूला सारत एक एक कामगाराला बाहेर काढण्यास मदत करतो.वरुन सतत माती पडत होती आणि हा व्यक्ती हाताने ती माती हटवत होता. जमीन अस्थिर असल्यामुळे या बचावकार्यात अनेक अडचणी आल्या मात्र तरीही त्यानं एक एक करत अशा एकूण ९ कामगारांना बाहेर काढलं.
मुसळधार पावसानंतर हे भूस्खलन झाले होते. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. दरम्यान याच महिन्याच्या सुरुवातीला खोदकामाच्या ठिकाणी अशाच एका घटनेत दोन खाण कामगारांचा मृत्यू झाला होता.