gondiya viral news almost half a kilo of hair was found in the stomach of a 10 year old girl | Loksatta

१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का

एका १० वर्षीय मुलीच्या पोटात तीन दिवसांपासून दुखायला सुरुवात झाली, तिला भूक लागणं देखील बंद झालं होतं

१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का
मुलीच्या पोटाचा सिटीस्कॅन केला अन् डॉक्टरांसह घरच्यांना धक्का बसला. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अनेक लहान मुलांना पाटीवरची पेन्सील, खडू किंवा माती खाण्याची सवय असते. त्यांनी अशा वस्तू खाऊ नयेत म्हणून पालक खबरदारी घेत असतात. मात्र, तरिदेखील मुलं पालकांची नजर चुकवून त्यांना हवं ते खाण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय आरोग्याला घातक पदार्थांचं सेवन केल्यामुळे अनेक मुलांना शाररिक समस्या देखील उद्भवतात.

सध्या गोंदीया जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलीला केस खाण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. कारण, या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल अर्धा किलो केस बाहेर काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गोंदियातील तिरोडा तालुक्यातील आहे.

हेही वाचा- पोट की पैशांचा खजिना? रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी काढली तब्बल १८७ नाणी

येथील एका १० वर्षीय मुलीच्या पोटात तीन दिवसांपासून दुखायला सुरुवात झाली, तिला भूक देखील लागत नव्हती. शिवाय तिच्या पोटाचं दुखणं काही केल्या थांबत नव्हतं आणि उलट्या होण्याचा त्रासही जाणवू लागल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिला एका रुग्णालायात दाखल केलं.

डॉक्टरांनी या मुलीची सोनोग्राफी करण्याता सल्ला दिला. मुलीची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात काहीतरी वेगळी वस्तू असल्याचं दिसलं. त्यामुळे या मुलीला गोंदिया येथील व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. या हॉस्पिटलमधील बालरोग तज्ञ डॉ. विभु शर्मा यांनी मुलीच्या पोटाचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा- बापरे! जन्माला आली चक्क शेपटी असलेली मुलगी, ५.७ सेंटीमीटरची शेपटी पाहून पालकांसह डॉक्टरही चक्रावले

तीन तास चाललं ऑपरेशन –

सिटीस्कॅन केला असता मुलीच्या पोटात असं काही आढळलं की ते पाहून डॉक्टरांसह मुलीच्या घरच्यांना धक्का बसला. कारण, या मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गुच्छा आढळून आला. शिवाय या मुलीला लहानपणी केस खाण्याची सवय होती. मात्र, सध्या ती केस खात नसल्याचं तिच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं. दरम्यान, डॉक्टर शर्मा यांनी जवळपास तीन तासं आॉपरेशन करुन मुलीच्या पोटातील केस काढले. शिवाय सध्या मुलीची प्रकृती चांगली असून तिला लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:48 IST
Next Story
Video: कॉलेजमध्ये बेभान नाचू लागल्या ४ तरुणी; ‘या’ अदा पाहताच नेटकरी झाले फिदा, तुम्हीही पाहा