भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील दोन महिन्यात अनेक खाजगी व सरकारी बँकाच्या रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक विविध योजना तयार करत आहेत. प्राप्त माहितीनुसार, रेपो दर वाढवल्यावर आता बँकमधील फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडीवर अधिक व्याजदर देण्यात येणार आहे. अलीकडेच चार मोठ्या बँकांनी आपण व्याजदर वाढवत असल्याची घोषणा केली असून येत्या काळात अन्य खाजगी व सरकारी बँक अशा तरतुदी अंमलात आणण्याच्या तयारीत आहेत. एफडीवर अधिक व्याजदर देणाऱ्या या चार बँक कोणत्या व यापुढे नक्की किती टक्के अधिक व्याज मिळणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

प्राप्त माहितीनुसार मागील दोन महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँक कडून सलग तिसऱ्यांदा खाजगी व सरकारी बँकांच्या रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे. यानंतर बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवून ग्राहकांना फायद्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

या चार बँकांनी वाढवले एफडी वरील व्याजदर

एचडीएफसी बँक

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीने १८ ऑगस्ट २०२२ पासून आपल्या व्याजदरात वाढ लागू करत असल्याची घोषणा केली आहे. सध्या एफडी दरात ४० बेस पॉईंट्सने वाढ करण्यात आली असून ही व्याजदर २ कोटींपेक्षा कमी किमतीच्या एफडीवर लागू असेल. यापुढे एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी करण्यात आलेल्या एफडीवर ५.५० टक्के व्याज मिळणार आहे.

आयडीएफसी बँक

आयडीएफसी बँकेनेही 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. 16 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेल्या नव्या व्याजदरानुसार भिन्न मुदतीच्या ठेवींसाठी वेगवेगळे व्याजदर लागू करण्यात आले आहेत. यापुढे आयडीएफसी मध्ये २ वर्ष १ दिवस ते ७४९ दिवसांच्या मुदतीसाठी केलेल्या गुंतवणूकीत ६.५० टक्के तर ७५० दिवसांच्या मुदतीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर ६.९० टक्के व्याजदर लागू होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व एफडीवर ०.५० टक्के अधिक व्याज दिले जाईल.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेने व्याजदरांसह गुंतवणूकीच्या मुदतीमध्येही वाढ केली आहे. नवीन बदलांनुसार यापुढे एफडीवरील व्याजदर हा ३९० दिवसांवरून ३ वर्ष इतका केलेला आहे. हे नवे दर २७ ऑगस्ट पासून लागू झाले आहेत. अगदी ७ दिवस ते १० वर्षापर्यंतच्या मुदतीपर्यंतच्या एफडीसाठी अनुक्रमे २.५० ते ५.९० टक्के इतका व्याजदर दिला जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ ते ६.४० टक्के व्याज दर दिले जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकने १७ ऑगस्ट पासून नवे व्याज दर लागू केले आहेत. एक वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंत आणि ५ वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीचा दर वाढवण्यात आला आहे. २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर हे नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत.

नव्या व्याजदराचे वैशिष्ट्य म्हणजे हे बदल २ कोटींपेक्षा कमी किमतीच्या गुंतवणुकीवर लागू होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा याचा नक्की लाभ होऊ शकतो.