गामा पैलवानाचा आज १४४वा वाढदिवस आहे. कुस्ती जगतात गामा कुस्तीपटूचा मान खूप मोठा होता. आपल्याला याचा अंदाज गुगलचे डुडल बघितल्यावर येईल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डूडल बनवून त्यांचा गौरव केला आहे. आजच्या दिवशी म्हणजे २२ मे १८७८ रोजी अमृतसरच्या जब्बोवाल गावात द ग्रेट गामा म्हणजेच गामा पैलवानयांचा जन्म झाला. त्यांचा जन्म काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुहम्मद अझीझ बक्श दतियाचे तत्कालीन महाराजा भवानी सिंग यांच्या दरबारात कुस्ती लढत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गामा पैलवान ६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पण तोपर्यंत त्यांचा कुस्तीपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला होता. वडील गेल्यानंतर गामा पैलवानयांचे आजोबा नून पैलवानयांनी त्यांना व त्यांच्या भावाला कुस्तीच्या युक्त्या शिकवण्याची जबाबदारी घेतली. यानंतर मामा इडा पैलवानानेही गामा आणि त्यांच्या भावालाही कुस्तीमध्ये निष्णात केले. १८८८ साली, गामा पैलवान अवघ्या १० वर्षांचे असताना, पहिल्यांदा जगाच्या नजरेत आले. त्यानंतर जोधपूरमध्ये सर्वात ताकदवान व्यक्ती शोधण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात ४०० हून अधिक पैलवानांनी भाग घेतला. यावेळी गामा शेवटच्या १५ मध्ये होता.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

एवढ्या लहान वयात गामाची ताकद पाहून जोधपूरचे महाराज थक्क झाले आणि याच कारणास्तव त्यांनी गामा यांना विजयी घोषित केले. यानंतर वडिलांप्रमाणे गामा यांनीही दतिया महाराजांच्या दरबारात कुस्ती खेळण्यास सुरुवात केली.

लहान वयातच गामाचे नाव सर्वत्र गुंजू लागले. ते दिवसातून १० तासांहून अधिक सराव करायचे आणि सरावासाठी एका दिवसात ४० पैलवानांशी कुस्ती खेळायचे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ते दररोज ५ हजार बैठक आणि ३ हजार दंड मारायचे. कधी-कधी ते डोनटच्या आकाराचे यंत्र परिधान करून ३० ते ४५ मिनिटे सराव करायचे, ज्याचे वजन १०० किलो होते. एवढेच नाही तर ते रोज ६ गावठी कोंबड्या, १० लिटर दूध, अर्धा लिटर तूप, दीड लिटर बटर, बदामाचे सरबत आणि १०० भाकऱ्या खात असत.

आपल्या ५ दशकांच्या कुस्ती कारकिर्दीत गामा पैलवानअपराजित राहिले. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी आखाड्यात कुस्ती खेळायला सुरुवात केली. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरणा दिली. त्यात ब्रूस लीसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. १९१० मध्ये ब्रूस ली लंडनला गेले. तेव्हा गामा यांनी खुले आव्हान दिले होते की, ते कोणत्याही वजन गटातील तीन पैलवानांना फक्त ३० मिनिटांत पराभूत करू शकतात. मात्र, त्यांचे हे आव्हान बाकीच्या कुस्तीपटूंनी हलक्यात घेतले. बराच काळ गामा पैलवानयांचे हे आव्हान कोणीही स्वीकारले नाही.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

अशा परिस्थितीत गामा यांनी हेव्हीवेट पैलवानांना आव्हान दिले. त्यांनी विश्वविजेता स्टॅनिस्लॉस जाविस्को, फ्रँक गॉच यांना आव्हान दिले. ते म्हणाले की, एकतर ते या दोघांना हरवत किंवा बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम परत करून निघून जातील. गामा यांचे आव्हान स्वीकारणारा पहिला कुस्तीपटू अमेपिकाचा बेंजामिन रोलर होता. गामा यांनी पहिल्या वेळी १ मिनिट ४० सेकंदात आणि दुसऱ्यांदा ९ मिनिटे १० सेकंदात रोलरला पराभूत केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी १२ पैलवानांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. भारतात परतल्यावर ५ फूट ८ इंच उंचीचे गामा पैलवान रुस्तम-ए-हिंदही बनले.

फाळणीच्या वेळी गामा पैलवानपाकिस्तानातच राहिले. पण त्यानंतर झालेल्या हिंसाचारात त्यांनी अनेक हिंदू कुटुंबांचे प्राण वाचवले. मात्र, गामा यांच्या कामगिरीची पाकिस्तान सरकारने दखल घेतली नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते पैशाच्या तुटवड्याशी झुंजत राहिले. १९६० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण, आजही त्यांचे नाव भारत आणि पाकिस्तानमध्ये घुमते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle 144th birth anniversery of legend gama pehlwan pvp
First published on: 22-05-2022 at 12:30 IST