‘या’ गुगल अॅपमुळे मोबाईल इंटरनेट डेटा वाचवू शकाल!

वापरलेल्या डेटाची माहितीही मिळणार

मोबाईल इंटरनेट पॅक यूजर्ससाठी इंटरनेट डेटा मॅनेज करणं ही मोठी डोकेदुखी असते. अनेकदा संपूर्ण दिवस नेट सुरू राहिल्यास डेटा कधी संपतो, तेच कळत नाही आणि तुम्ही नाराज होता. आर्थिक फटकाही बसतो. प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप आहेत, जे डेटा मॅनेज करण्यासाठी मदतगार ठरतात. आता गुगलनंही असाच डेटा वाचवणारा अॅप आणण्याची तयारी केली आहे. या अॅपमुळे तुमचा डेटा वाचू शकतो, असा दावा गुगलनं केला आहे.

गुगलच्या या अॅपचं नाव ‘ट्रॅँगल’ आहे. फिलीपाइन्समध्ये या अॅपची चाचणी केली जात आहे. हे अॅप गुगल प्लेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणीच त्याची चाचणी सुरू असल्यानं ते डाऊनलोड करता येणार नाही. या अॅपनं मोबाईलमधील बॅकग्राऊंड अॅपनाही ब्लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मोबाईलमधील अनेक अॅप तुमच्या नकळत सुरूच असतात. असे अॅप तुम्हाला ब्लॉक करता येणार आहेत. ट्रँगल अॅप तुम्हाला काही अॅप १० ते ३० मिनिटे सुरु ठेवण्याची परवानगी देता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून मोबाइल डेटा किती शिल्लक आहे आणि तुम्ही किती डेटा वापरला आहे, याची माहितीही स्क्रीनवर मिळू शकणार आहे. तसंच अॅप वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटा प्लानसारखे फायदेही मिळू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google is to bring internet data saving app triangle

ताज्या बातम्या