Chhath Puja 2024 Date, Time, Significance in Marathi : यंदा छठ पूजा ५ नोव्हेंबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत साजरी केली जाणार आहे. चार दिवसाच्या या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या चार दिवसांमध्ये सूर्य देव आणि छठी देवीची पूजा केली जाते. बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. महिला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी या कालावधीत निर्जळी उपवास करतात. (google trend Chhath Puja 2024 why chat puja celebrated know the importance of four days of festival)

छठ पूजा का साजरी केली जाते?

शास्त्रांनुसार, कार्तिक महिन्यात सूर्य त्याच्या नीच राशीमध्ये विराजमान असतो त्यामुळे सूर्यदेवाची विशेष उपासना केली जाते जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये. षष्ठी तिथीचा संबंध थेट मुलांच्या आयुष्यावर दिसून येतो. त्यामुळे सूर्य देव आणि षष्ठी पूजेमुळे अपत्य प्राप्ती आणि अपत्यांच्या आयुष्याची सुरक्षा केली जाते.
काही अभ्यासकांचे मते, प्रभू राम आणि देवी सीता लंकेतून अयोध्येत विजयी होऊन परतल्यानंतर त्यांनी सूर्यदेवासाठी उपवास आणि यज्ञ केला होता तेव्हापासून ही प्रथा अस्तित्त्वात आल्याचे मानले जाते.

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा

छठ पूजा – चार दिवसांचा सण

छठ पूजाच्या या सणातून निसर्गाचा सन्मान केला जातो. पहिल्या दिवसाल ‘नाहा खा’ असे म्हणतात. उपवास करणारी व्यक्ती स्नान केल्यानंतरच जेवण करतात. अंघोळीनंतरच्या जेवणात भोपळ्याची भाजी असते.
दुसर्‍या दिवसाला ‘खरना’ म्हणतात, या दिवशी उपवास करणारी व्यक्ती रात्री एकवेळचे जेवण करतात ज्यात रोटी आणि खीर (तांदळाची खीर) असते .रोटी-खीर जेवणानंतर ३६ तासांचा उपवास सुरू होतो, ज्या दरम्यान पाणीही पीता येत नाही.

तिसर्‍या दिवशी भाविक पाणवठ्यावर जातात. देवाला अर्पण केलेले सर्व प्रसाद दिव्यांबरोबर सूपात मध्ये ठेवतात आणि सूर्यास्त होताच, उपवास करणारी व्यक्ती अर्ध्य म्हणून सूपची पूजा करतात. याला सांज का अर्ध्य किंवा संध्याकाळचे अर्पण म्हणतात.

हेही वाचा : Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या

चौथ्या दिवशी, ‘भोर का अर्ध्य’ नावाचा उगवत्या सूर्यासाठी, पहाटेच्या वेळी विधी केला जातो. त्यानंतर देवतेकडे कृतज्ञता व्यक्त करून भाविक उपवास सोडतात.