Google Trend Instagram down: सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही; तर ते आज प्रत्येक वयोगटातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे, त्यामुळे इंटरनेट किंवा सोशल मीडियासंबंधी काहीही अडचणी निर्माण झाल्या की लोक चलबिचल होतात. मागील काही तासांपासून अनेक युजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचण येत आहे. जर हे खरं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, मेटाच्या इन्स्टाग्रामवर सध्या भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात आउटेज येत आहे. ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरवर, अमेरिकेतील १०,००० हून अधिक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये समस्या नोंदवल्या आहेत.
दरम्यान, भारतात आतापर्यंत ९०० हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या असून बहुतेक तक्रारी मोबाईल ॲपशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. डाउनडिटेक्टरच्या आकडेवारीनुसार अंदाजे ७८% वापरकर्त्यांना ॲपशी संबंधित समस्या येत आहेत, तर १३% वापरकर्त्यांनी वेबसाईट समस्या नोंदवल्या आहेत आणि १०% वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शन समस्या नोंदवल्या आहेत.
डाउनडिटेक्टरच्या मते, सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास भारतात इन्स्टाग्राम खंडित झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर त्रस्त झालेल्या वापरकर्त्यांनी ट्विटरवर त्यांचे अनुभव शेअर केले. एका वापरकर्त्याने शेअर केले की, “इन्स्टाग्राम डीएम बंद आहेत का हे पाहण्यासाठी प्रत्येकजण ट्विटरवर जात आहे,” तर दुसऱ्याने पोस्ट केले की, “मला एक महत्त्वाचा डीएम पाठवायचा आहे, तेव्हाच इन्स्टाग्राम डीएम बंद आहेत.”
मेटाने कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही

दरम्यान, मेटाने अद्याप संपूर्ण आउटेजबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. इन्स्टाग्राममध्ये समस्या येत असलेल्या वापरकर्त्यांना आता मेटाने समस्येचे निराकरण करेपर्यंत आणि प्लॅटफॉर्म पुनर्संचयित होईपर्यंत वाट पहावी लागेल. दरम्यान, सध्या गूगलवर Instagram down हा कीवर्ड प्रचंड सर्च होत आहे. मागील काही तासांमध्ये दोन हजारांहून अधिक लोकांनी हा वर्ड सर्च केला आहे.
