Yogini Ekadashi 2026 : हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाला विशेष स्थान आहे. १० जुलै २०२६ शुक्रवारी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे जिला योगिनी एकादशी नावाने ओळखले जाते. या दिवशी व्रत-उपवास केल्यास पापांमधून सुटका मिळून आयुष्यात सुख, समृद्धी आणि उन्नती घेऊन येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शुक्रवारच्या दिवशी एकादशी आल्याने अत्यंत शुभ संयोग निर्माण झाला आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णूची एकत्रित महाकृपा लाभणार आहे.

सध्या गुगल ट्रेडमध्ये Yogini Ekadashi 2026 हा किवर्ड देखील ट्रेंड होत आहे. याबाबत अधिक जाणून घेऊ या.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरामुळे योगिनी एकादशीला मेष, वृषभ, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना खास फायदा मिळेल. यशाचे दार उघडेल. या राशींचे लोक यशाच्या शिखरावर पोहोचतील. करिअरपासून व्यवसायापर्यंत मोठे लाभ मिळतील.

कोणत्या आहेत त्या चार राशी ज्यांना मिळेल लाभ (Which of those four have benefited?)

मेष (Aries):

योगिनी एकादशीला तुमचे नशीब चमकणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल होणार आहे. जर तुम्ही नवीन बिझनेस किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करणार असाल तर उद्याचा दिवस सर्वोत्तम आहे. अडकलेली सर्व कामे वेगात पूर्ण होतील.

वृषभ (Taurus):

योगिनी एकादशीला तुमच्यासाठी यशाचे मार्ग उघडणार आहेत. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये कौशल्य दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल ज्यामुळे तुमचे वरिष्ठ आणि बॉस तुमच्या कामगिरीने खुश होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.

कन्या (Virgo):

योगिनी एकादशीला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात नवीन ऑर्डर किंवा मोठा करार मिळाल्याने तुमचा नफा दुप्पट होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अगदी चांगला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते.

धनु (Sagittarius):

व्यवसायाच्या दृष्टीने उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. उद्याच्या व्यावसायिक सहली पूर्णपणे यशस्वी आणि फायदेशीर ठरतील. योगिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, जीवनसाथीचा सल्ला तुमच्या करिअरला नवी दिशा देईल.

Yogini Ekadashi Vrat
योगिनी एकादशी ‘या’ ४ राशींचे लोक पोहोचणार यशाच्या शिखरावर (फोटो सौजन्य – गुगल ट्रेंड)

योगिनी एकादशीच्या व्रताची कथा (The story of the Yogini Ekadashi fast)

आख्यायिकेनुसार, अलकापुरी शहराचा राजा कुबेर याचा हेम नावाचा एक माळी होता, जो दररोज शिवपूजेसाठी मानसरोवरहून फुले आणत असे. एके दिवशी आपल्या पत्नीच्या प्रेमाच्या बंधनात तो वेळेवर फूल ठेवायला विसरला. यामुळे संतप्त झालेल्या कुबेराने त्याला शाप दिला की, त्याला स्त्रीविरहाचा त्रास होईल आणि तो मर्त्यलोकात (पृथ्वीवर) जाऊन कुष्ठरोगी होईल.

शापाच्या प्रभावाखाली, हेम माळी भटकत होता आणि मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ऋषींनी त्याचे दुःख ऐकून घेतले आणि त्याला आषाढ महिन्यात म्हणजेच योगिनी एकादशीला उपवास करण्याचा सल्ला दिला. हेम माळीने पूर्ण श्रद्धेने हा उपवास केला, ज्याच्या प्रभावाने त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला आणि त्याला त्याचे दिव्य रूप व पत्नीची साथ परत मिळाली. तेव्हापासून असा विश्वास आहे की, हा उपवास केल्याने शारीरिक आजार आणि नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते.