Google Trending Vishal Mega Mart IPO Date : ‘विशाल मेगा मार्ट’ ही सुपरमार्केट स्टोअर्स चालवणारी कंपनी दैनंदिन गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री करते. ही कंपनी डी-मार्टप्रमाणे काम करते. सध्या या कंपनीची शेअर मार्केटमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण- ‘विशाल मेगा मार्ट’ कंपनी त्यांचा नवा कोरा आयपीओ पुढील आठवड्यात आणत आहे. हा मेगा आयपीओ गुंतवणूकदारांना दमदार कमाई करून देईल, अशी चर्चा आहे. आज आपण हा आयपीओ कधी येतोय, कधी लिस्ट होतोय, तसेच या आयपीओमधील प्रतिशेअरची किंमत किती? आदींविषयीची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

केव्हापासून सुरू होणार सबस्क्रिप्शन? कधी होणार हा आयपीओ लिस्ट?

८,००० कोटी रुपयांचा हा आयपीओ ११ डिसेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध होईल आणि १३ डिसेंबरला तो बंद होईल. कंपनीने त्यांच्या या आयपीओचा प्राइस बॅण्ड ७४-७८ रुपये निश्चित केला आहे.
विशाल मेगा मार्टचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर लिस्ट होणार आहेत. हे शेअर्स १८ डिसेंबर २०२४ रोजी लिस्ट होतील.

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

हेही वाचा : ‘ईपीएफओ’ची समभागसंलग्न गुंतवणूक २४.७५ लाख कोटींवर

एका शेअरची किंमत किती?

विशाल मेगा मार्ट आयपीओच्या एका शेअरची किंमत ही ७८ रुपये आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर आतापासून १३.५० रुपयांनी ट्रेड करीत आहे. आताच्या ग्रे मार्केट प्रीमियम (GMP)नुसार विशाल मेगा मार्टचे शेअर ९१ रुपयांच्या वर बाजारात लिस्ट होऊ शकतात.

एका लॉटसाठी किती रुपये गुंतवावे लागतील?

विशाल मेगा मार्टच्या या आयपीओसाठी रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी एका लॉटसाठी आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात. एका रिटेल गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी १४,८२० रुपये गुंतवावे लागतील. प्रतिशेअर फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. हा आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) असेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारा पैसा कंपनीला मिळणार नाही.

हेही वाचा : सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला; नोव्हेंबरमध्ये पीएमआय निर्देशांकाची ५८.४ गुणांवर घसरण

विशाल मेगा मार्ट कंपनी २००१ मध्ये सुरू करण्यात आली. हायपरमार्केट चेन विशाल मेगा मार्ट अपॅरल, ग्रोसरीज, इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेस यांसारख्या वस्तूंची विक्री करते. सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कंपनीची एकूण ६४५ विशाल मेगा मार्ट स्टोअर्स भारतात कार्यरत आहेत.
विशाल मेगा मार्टचा हा आयपीओ या वर्षीच्या मोठ्या आयपीओमधील एक असेल. यापूर्वी स्विगीचा ११,००० कोटी रुपयांचा, एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा ११,००० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आला होता.

Story img Loader