Tesla Flying Car : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांनी जगासमोर पुन्हा एकदा एका अद्भूत तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले आहे. टेक्सासमधील स्पेसएक्सच्या रॉकेट डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये झालेल्या एका खास प्रात्यक्षिकादरम्यान, टेस्लाच्या नवीन ‘रोडस्टर २’ (Roadster 2) या सुपरकारने हवेत झेप घेत सर्वांनाच थक्क केले. ही कारने केवळ रस्त्यावर धावत नाही तर थेट हवेतही उडू शकते ज्यामुळे अनेकांचे ‘फ्लाइंग कार’चे स्वप्न सत्यात उतरले आहे.

थरारक प्रात्यक्षिक (Thrilling Demonstration)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, टेस्लाची ही इलेक्ट्रिक सुपरकार एका भल्यामोठ्य वक्र आकाराच्या रॅम्पवर (Curved Ramp)वरून धावताना दिसते. या रॅम्पवरून धावताना ही कार पुर्णपणे उलटी होते अन् पुढच्याक्षणी हवेत तरंगू लागते. काही सेंकद हवेत उडत ती पुन्हा अत्यंत सुखरूपपणे जमिनीवर खाली उतरते. यासुपरकारचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर एलन मस्क म्हणाले,”हे यशस्वी झाले!” (Well, it worked) तर टेस्लाचे वाहन अभियांत्रिकी (Vehicle Engineering) उपाध्यक्ष लर्स मोरावी (Lars Moravy) यांनी उत्साहात घोषणा केली, “उडणाऱ्या कार आता खरंच अस्तित्वात आहेत.”

याच प्रात्यक्षिकादरम्यान, रोडस्टरने कंपनीच्या संपूर्ण कारच्या ताफ्यावरून (Lineup) आणि सायबरट्रकच्या (Cybertruck) अगदी वरून हवेत झेप घेतली आणि पुन्हा सुरक्षित लँडिंग केले. विशेष म्हणजे, ही कार अवघ्या १ सेकंदात ० ते ६० mph (मॅक प्रति तास) चा वेग पकडण्यास सक्षम असल्याचा दावा टेस्लाने केला आहे.

Roadster 2 हवेत कशी उडते? (How does the Roadster 2 fly?)

लोकांच्या मनात हाच सर्वात मोठा प्रश्न होता की ही कार उडते कशी? यावर प्रकाश टाकताना लर्स मोरावी यांनी स्पष्ट केले की, यामागील ‘फ्लाइंग’ तंत्रज्ञान हे ‘स्पेसएक्स’च्या थ्रस्टर्सवर आधारित आहे.

टेक्क्रंचच्या रिपोर्टनुसार, रोडस्टर हवेत उचलण्यासाठी आणि फिरवण्यासाठी तब्बल ६० लीटर कंप्रेस्ड एअरने (Compressed air) जोडलेल्या १० थ्रस्टर्सचा वापर करते. टेस्लाने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कारमध्ये जितका जास्त कंप्रेस्ड एअर असेल, तितका जास्त उड्डाणाचा वेळ (Flight time) मिळेल.”

खरेदीसाठी केव्हा उपलब्ध होणार? (When will it be available for purchase?)

टेस्लाची पहिली कार असलेल्या ‘रोडस्टर’चा हा बहूप्रतीक्षित नेक्स्ट व्हर्जन आहे. याची घोषणा २०१७ मध्ये झाली होती आणि ही कार गेल्या जवळपास एका दशकापासून विकसित होत आहे. टेस्लाने ही कार २०२५ पर्यंत बाजारात आणण्याचे वचन दिले होते.

परंतु, आजच्या या भव्य प्रात्यक्षिकांनंतरही ही सुपरकार लगेचच खरेदीसाठी उपलब्ध होणार नाही. मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, ही कार प्रत्यक्ष उत्पादनात २०२८ मध्ये उतरेल.

Tesla Roadster 2
एलॉन मस्कने आणली जगातील पहिली ‘उडणारी कार’! (फोटो सौजन्य – Google Trends)

किंमत किती असणार? (How much will it cost?)

टेस्ला ही रोडस्टर २ कार एकूण तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये बाजारात आणत आहे:

  • १. ‘परफॉर्मन्स’ (Performance): हे मॉडेल रस्त्यासाठी पूर्णपणे तयार (Road ready) असल्याचे वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे.
  • २. ‘थ्रस्ट’ (Thrust): या दुसऱ्या टप्प्यातील मॉडेलला ‘रेस रेडी’ (Race ready) असे म्हटले गेले आहे.
  • ३. ‘रॉकेट’ (Rocket): हे टॉप-टियर मॉडेल टेस्लाने ‘एअर रेडी’ (Air ready) म्हणून सादर केले आहे.

कंपनीने या कारच्या रिझरव्हेशन बुकिंग सुरू केले आहे. ‘परफॉर्मन्स’ व्हेरिएंटचे रिझरव्हेशन करण्यासाठी ५०,००० डॉलर्स मोजावे लागतील, तर ‘थ्रस्ट’ व्हेरिएंटसाठी २,५०,००० डॉलर्स खर्च करावे लागतील. सर्वात भारी असणारे ‘रॉकेट’ मॉडेल मात्र केवळ ‘खा लोकांसाठी’ (Invite only) असून त्याचे थेट बुकिंग करता येणार नाही.