Gold and Silver Prices March 2, 2026: सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठी घडामोड झाली आहे. जर आज तुम्ही सोने-चांदीच्या खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजच्या किंमतीवर एकदा नजर टाका. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे (मध्य पूर्वेतील युद्ध) संपूर्ण जगाच्या बाजारपेठा हादरल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपासून ते भारतीय सराफा बाजारांपर्यंत सोन्या -चांदीच्या किमती वाढल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) च्या वेबसाइटनुसार, आज, सोमवार, २ मार्च २०२६ रोजी, आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी, सोन्याच्या किमतीत ४% ची मोठी वाढ दिसून येत आहे.

आज सोन्याच्या किमतीत वाढ का होत आहे? (Why is the price of gold increasing today?)

पश्चिम आशियात आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तणाव अधिकच तीव्र झाला असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायांकडे धाव घेतली आहे. जोखीम घेण्याची तयारी कमी झाल्यामुळे इक्विटी आणि इतर अस्थिर मालमत्तांमधून निधी काढून तो पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीकडे — विशेषतः सोने आणि चांदीकडे — वळवण्यात आला आहे. याचा परिणाम देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारतात सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली मोठी उसळी (Gold and silver prices in India have seen a big jump)

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) च्या वेबसाइटनुसार सोमवारी सकाळी ९:१० वाजता सोन्याचा दर १, ६८,८५०रुपयांवर पोहचला असून ४.१६% वाढ नोंदवली गेली, तर चांदीचा दर २,९५,७२१ रुपयांवर पोहचला असून ४.६३% ने महागली आहे.

Gol Silver Rate
सोन्या चांदीचे भाव (सौजन्य – MCX)

तणाव वाढण्याची भीती

तेहरानने अमेरिकन-इस्रायली कारवाईला प्रत्युत्तर देत अनेक टप्प्यांत क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत इस्रायलमधील ठिकाणांसह कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे हा संघर्ष प्रादेशिक स्तरावर अधिक भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घडामोडींमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूचीही बातमी समोर आली असून त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

भारतातील आजचा सोन्याचा दर (₹ प्रति १० ग्रॅम)

FEनुसार, आजचे सोन्याचे दर खालील प्रमाणे

प्रकार आजचा भाव (₹) कालचा भाव (₹)बदल (₹) बदल (%)
२४ कॅरेट १६९,५३०
१६२,१९० ७,३४०.०० ४.५३%
२२ कॅरेट १५५,४०३
१४८,६७४ ६,७२८.३० ४.५३%
१८ कॅरेट १२७,१४८ १२१,६४३ ५,५०५.०० ४.५३%

प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर (₹ प्रति १० ग्रॅम)

FEनुसार, प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर खालील प्रमाणे

शहर)
२४ कॅरेट (₹) २२ कॅरेट (₹) १८ कॅरेट (₹)
अहमदाबाद
१६९,७६० (७,३५०.००) १५५,६१३ (६,७३७.५०) १२७,३२० (५,५१२.५०)
बंगळुरू १६९,६७० (७,३५०.००)
१५५,५३१ (६,७३७.५०) १२७,२५३ (५,५१२.५०)
चेन्नई
१७०,०३० (७,३७०.००) १५५,८६१ (६,७५५.८०) १२७,५२३ (५,५२७.५०) )
दिल्ली
१६९,२४० ( ७,३३०.०० ) १५५,१३७ ( ६,७१९.२०) १२६,९३० ( ५,४९७.५० )
हैदराबाद
१६९,८०० ( ७,३५०.०० ) १५५,६५० ( ६,७३७.५० ) १५५,६५० ( ६,७३७.५० )
कोलकाता
१६९,३१० ( ७,३३०.०० ) १५५,२०१ ( ६,७१९.१० ) १२६,९८३ ( ५,४९७.५० )
मुंबई १६९,५३० ( ७,३४०.०० )
१५५,४०३ ( ६,७२८.३० ) १२७,१४८ ( ५,५०५.०० )
पुणे १६९,५३० (७,३४०.००) १५५,४०३ (६,७२८.३०)१२७,१४८.०० (५,५०५.००)
सुरत १६९,७६० (७,३५०.०० ) १५५,६१३ ( ६७३७.५०) १२७,३२० ( ५,५१२.५०)

सोन्याच्या दीर्घकालीन तेजीमागील कारणे

तात्कालिक भू-राजकीय तणावाव्यतिरिक्त, गेल्या काही महिन्यांपासून सोन्यात सातत्याने तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बदलणारे जागतिक राजनैतिक समीकरण, तसेच जागतिक आर्थिक अनिश्चितता, यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सोन्याला अधिक मागणी मिळत आहे.

Gold Rate Google Trend
सोन्याचेभाव-(फोटोसौजन्य-गुगल ट्रेंड)

एकूणच, वाढता तणाव आणि अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांचा कल सध्या सुरक्षित मालमत्तांकडे वळलेला दिसत आहे.