Puranpoli Amati Recipe :होळी म्हटलं की घराघरात पुरणपोळीचा सुगंध दरवळतो. रंगपंचमीच्या जल्लोषात गोड पुरणपोळीबरोबर जी चव तिखट-आंबट चव संतुलन साधते ती म्हणजे कटाची आमटी. पुरण काढल्यानंतर उरलेल्या डाळीच्या पाण्यापासून तयार होणारी ही आमटी ‘येळवणीची आमटी’ म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रीयन पुरणपोळी ताटात तर्रीदार, सुगंधी आणि मसालेदार कटाची आमटी हीच खरी शान मानली जाते.

गुगल ट्रेंडमध्येही होळी हा विषय चर्चेत आहे. होळीनिमित्त खास पुरणपोळीचा बेत आखणार असाल तर दोन पद्धतींनी कटाची आमटी कशी तयार करायची ते जाणून घ्या.

१) बिना कांदा-लसूण कटाची आमटी (नेवेद्यासाठी योग्य) (Without Onion Garlic Katachi Amati)

साहित्य:
सुके खोबरे १/४ वाटी, ओले खोबरे १/४ वाटी, दालचिनी १ तुकडा, लवंग २, आले १ इंच, कोथिंबीर १/४ वाटी.
फोडणीसाठी: तेल २-३ चमचे, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग १/४ चमचा, हळद १/४ चमचा, मिरची पावडर १ चमचा, गोड मसाला १ चमचा, चिंचेचा कोळ २-३ चमचे, गूळ २ चमचे, पुरणपोळीचा कट (येळवणी), मीठ, कोथिंबीर.

कृती:
वाटणासाठी मसाल्याचे सर्व साहित्य बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी-जिरे तडतडू द्या. कढीपत्ता, हिंग, हळद घाला. तयार वाटण परतून घ्या. त्यात मिरची पावडर, गोड मसाला, कटाचे पाणी, चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालून ८-१० मिनिटे उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला.

२)गावरान कटाची आमटी | झणझणीत कटाची आमटी | गावाकडच्या पद्धतीने कटाची आमटी | Gavran Maharashtrian Katachi Amati | Zanzanit Katachi Amati Recipe |

साहित्य:
सुके खोबरे १/४ वाटी, दालचिनी १, लवंग २, तीळ १ चमचा, कांदा १, लसूण पाकळ्या १५-२०, आले १ इंच, कोथिंबीर.
फोडणीसाठी: तेल ४ चमचे, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद, बेडगी तिखट १ चमचा, कांदा-लसूण मसाला १ चमचा, पुरण २ चमचे, कटाचे पाणी, मीठ, कोथिंबीर.

कृती:
वाटणातील साहित्य भाजून वाटून घ्या. तेलात फोडणी देऊन तयार वाटण परता. मसाले घालून पुरण आणि कटाचे पाणी मिसळा. चांगली उकळी आणून वरून कोथिंबीर घाला.

खास टिप्स

तर्री हवी असल्यास तेलाचे प्रमाण किंचित वाढवा.
आंबट-गोड संतुलनासाठी चिंच आणि गूळ प्रमाणात ठेवा.
दुसऱ्या दिवशी आमटी अधिक चविष्ट लागते.

Google Trends
होळी २०२६(फोटो सौजन्य – Google Trends)

होळीच्या सणात पुरणपोळीबरोबर ही झणझणीत कटाची आमटी नक्की करून पाहा.