scorecardresearch

Premium

जानेवारीला म्हणतात ‘जुंगू’, सरकारी शाळेतील शिक्षिकेचं इंग्रजी ऐकून लाजतील ब्रिटिशही; पाहा VIDEO

शिक्षिकेने जानेवारीच्या जागी जो काही शब्द लिहिला तो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

english teacher teaching wrong english but earning rs 55000 in per month but on goverment school watch viral video
जानेवारीला म्हणतात 'जुंगू', सरकारी शाळेतील शिक्षिकेचं इंग्रजी ऐकून लाजतील ब्रिटिशही; पाहा VIDEO (फोटो – factszonee instagram)

Government Teacher Wrote Wrong Spelling Of January : इंग्रजी ही जगभरात वापरली जाणारी भाषा असल्याने हल्ली पालक आपल्या मुलांना थेट इंग्रजी शाळेत शिकायला पाठवीत आहेत. युरोप, अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये प्रवास करताना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असते. त्यामुळे परदेशांत जाणारे अनेक भारतीय आपली इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. काही शाळांतील शिक्षकही विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

पण, सर्वच शाळांमध्ये इंग्रजी उत्तम शिकवता येणारे शिक्षक असतीलच, असे सांगता येत नाही. काही शाळांमध्ये तर शिक्षकांना इंग्रजी नीट वाचताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. परिणामी अशा शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना चुकीचे इंग्रजी शिकवले जाते. सध्या अशाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिता आला नाही. तिने जानेवारीच्या जागी जो काही शब्द लिहिला तो पाहून ब्रिटिशही लाजतील. तिने नेमका कोणता शब्द लिहिला हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.

raj thackeray mns latest news marathi
“पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर…”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “शासनानं मराठीवर फक्त एवढे उपकार करावेत”
UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
gyanvapi sita sahoo
“ज्ञानवापीच्या जागी हिंदू मंदिरं होती”, सर्वेक्षणानंतर याचिकाकर्त्या म्हणाल्या, “आम्ही स्वतः पाहिलं, तिथे अतिप्राचीन…”
The mystery of firing on the motor vehicle inspector increased Nagpur
मोटार वाहन निरीक्षकावरील गोळीबाराचे गुढ वाढले

व्हिडीओमध्ये इन्स्पेक्शनसाठी आलेला अधिकारी एका महिला शिक्षिकेला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिण्यास सांगताना दिसतेय. त्यानंतर तिने ज्या प्रकारे हा शब्द लिहिला ते पाहून बाजूला उभे असलेला अधिकारीही चक्रावला.

factszonee या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही महिला शिक्षिका एका सरकारी शाळेत कार्यरत आहे. दरम्यान, इन्स्पेक्शनसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याने महिलेला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीत लिहिण्यास सांगितला. पण, तिला त्या शब्दाचे स्पेलिंग नीट लिहिता आले नाही म्हणून तिने इंग्रजीच्या जागी JUNGU (जुंगू) असे लिहिले. आता अशा शिक्षकांना दरमहा ५५ हजार रुपये वेतन का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

शिक्षिकेच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर युजर्स आता भरभरून कमेंट्स करीत आहेत. एका युजरने मजेशीर कमेंट करीत लिहिले की, प्रश्नच चुकीचा होता. तुम्ही त्यांना जुगनूची स्पेलिंग लिहिण्यास सांगितली असती, तर त्यांनी जानेवारीची स्पेलिंग नीट लिहिली असती. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, आम्ही खासगी शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आपले आरोग्य, वेळ व सर्व काही पणाला लावले आहे. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सरकारी शाळेतील शिक्षकांच्या शिकवणीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goverment school english teacher teaching wrong english but earning rs 55000 in per month see viral video sjr

First published on: 09-12-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×