scorecardresearch

केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा आणण्याच्या तयारीत, नैसर्गिक आपत्ती आणि आण्विक हल्ल्याचाही असेल समावेश

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांनी नवीन राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या मसुद्यातील विविध तरतुदींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

COVID-hospital-1200-express
केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा आणण्याच्या तयारीत, नैसर्गिक आपत्ती आणि आण्विक हल्ल्याचाही असेल समावेश (Photo- Indian Express)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांनी नवीन राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या मसुद्यातील विविध तरतुदींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यापूर्वी सल्लामसलत करण्यासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवला जाईल, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. नवीन मसुद्यात अनेक परिस्थितींचा अभ्यास केला गेला आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची तरतूद देखील आहे. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा २०१७ पासून कार्यान्वित आहे. हा कायदा मंजूर झाला की तो १२५ वर्षे जुना महामारी रोग कायदा, १८९७ ची जागा घेईल. जैविक हल्ला, नैसर्गिक आपत्ती, रासायनिक आणि आण्विक हल्ल्यांमुळे सार्वजनिक आरोग्य आणि आपत्कालीन परिस्थिती देखील या कायद्यांतर्गत कव्हर होईल.

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाचे नेतृत्व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करण्याचा प्रस्ताव आहे. याचे नेतृत्व राज्यांचे आरोग्य मंत्री करतील. जिल्हाधिकारी पुढील स्तरावर नेतृत्व करतील आणि ब्लॉक युनिट्सचे नेतृत्व ब्लॉक वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक करतील. या अधिकाऱ्यांकडे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे अधिकार दिले जातील. मसुद्यात आयसोलेशन, क्वारंटाईन आणि लॉकडाऊन यांसारख्या विविध उपायांची व्याख्या केली आहे. कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र आणि राज्यांनी मोठ्या प्रमाणावर लागू केली आहेत. लॉकडाउनच्या व्याख्येत सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी व्यक्तींच्या हालचाली किंवा एकत्र येण्यावर निर्बंध समाविष्ट आहेत. त्यात कारखाने, संयंत्रे, खाणकाम, बांधकाम, कार्यालये, शैक्षणिक संस्था किंवा बाजारपेठेतील कामकाजावर प्रतिबंध घालणे देखील समाविष्ट आहे.

कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरात पुन्हा होणार बदल; NTAGIने केली महत्त्वाची शिफारस

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य (प्रतिबंध, नियंत्रण आणि महामारी, जैव-दहशतवाद आणि आपत्ती व्यवस्थापन) कायदा, २०१७ मसुदा जारी केला होता. सप्टेंबर २०२० मध्ये, तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी संसदेत घोषणा केली होती की, सरकार राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा करेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Government preparing to enact new national health law including natural disaster and nuclear attack rmt

ताज्या बातम्या