आजकाल अनेक लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जाते. शिवाय ऑनलाइन फसवणूक होण्याला सर्वात जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कारणीभूत ठरतो. देशातील सायबर क्राइमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ एक चिंतेची बाब बनली आहे. यासाठीच सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सरकारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये YouTube ‘लाइक आणि सबस्क्राइब’ घोटाळे कसे होतात आणि त्यापासून आपलं संरक्षण कसं करावं याची माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाय या व्हिडीओद्वारे घोटाळेबाज तुमची फसवणूक कसे करतात हे देखील समजावून सांगण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय सांगितलं आहे. ते जाणून घेऊ या. सरकारने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये व्हाट्सअ‍ॅप आणि टेलेग्रामचा वापर करून लोकांची फसवणूक कशी केली जाते हे सांगितलं आहे.

हेही पाहा- रेल्वेतील चादर उशी बॅगेत भरली, चोरी उघड होताच खोटी कारणं सांगितली; Video व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…

अशी करतात फसवणूक –

सर्वात आधी तुम्हाला व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला जातो. या मेसेजद्वारे तुम्हाला युट्यूबवरील व्हिडीओ सबस्क्राइब आणि लाइक करायला सांगतात. यासाठी तुम्हाला काही रक्कम दिली जाते. शिवाय ठराविक रक्कम दिल्यानंतर ते तुम्हाला त्यांच्या काही स्कीममध्ये गुंतवणूक करायला सांगतात. तसेच तुम्हाला पार्टटाइम जॉब लावण्याचे आमिष दाखवतात आणि तुम्हाला एखाद्या मोठ्या घोटाळ्यात अडकवतात.

हेही पाहा- ‘तो जिंवत आहे का…’ मॅच जिंकल्याचा आनंद, पठ्ठ्याने फॅमिली ग्रुपमध्ये पाठवला बिअर कॅनचा फोटो; Chat व्हायरल होताच युजर्स म्हणाले…

तुम्हाला कामाची ऑफर दिल्यानंतर तुम्ही केलेल्या कामाचे काही पैसेदेखील तुम्हाला दिले जातात. तुम्ही त्यांच्या या ऑफरला होकार देताच तुम्हाला टेलेग्रामवर एका टास्क मॅनेजरच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जात. या ठिकाणी तुम्हाला काम दिलं जातं. शिवाय या कामाच्या मोबदल्यात काही पैसेदेखील दिले जातात. मात्र ती रक्कम फक्त तुमच्या ॲपवर दिसते. त्या खात्यातील पैसे काढण्याची परवानगी तुम्हाला दिली जात नाही. शिवाय या ऑफरमध्ये जेव्हा तुम्ही मोठी गुंतवणूक करता तेव्हा मात्र तुम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केलं जातं, अशी माहिती व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt shared video to inform about like and subscribe youtube fraud cyber crime news jap
First published on: 28-05-2023 at 17:21 IST