Grandfather And Granddaughter Dance Video : सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने सोशल मीडियावरही याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसता. त्यात विशेषत: नवरा-नवरीच्या डान्सचे, तर कधी कुटुंबीयांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आहेत. त्यातील काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की, ते तुम्हाला टाळ्या वाजवायला भाग पाडतात’ तर काही मन जिंकतात. सध्या नात आणि आजोबांच्या जोडीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यात चिमुकली आणि तिच्या आजोबांची जोडी लग्नातील संगीत समारंभात नाचताना दिसतेय. त्यांचा हा डान्स पाहून तुमचाही चेहरा आनंदाने खुलेल.
सध्या सोशल मीडियावर एक नंबर तुझी कंबर हे गाणे चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. त्यात गाण्यात आजोबा आणि नातीने ठेका धरलाय. तिघेही अगदी आत्मविश्वासाने स्टेजवर वावरताना दिसतायत. पारंपरिक पोशाख परिधान करून तिघेही गाण्याच्या तालावर एकरूप होऊन नाचतायत. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य, उत्साह व निरागसता स्पष्ट दिसून येतेय.
व्हिडीओत पाहू शकता की, चिमुकली गाणं सुरू होताच अगदी हसून नाचायला सुरुवात करते. यावेळी तिला साथ देण्यासाठी तिचे दोन्ही आजोबा स्टेजवर येतात आणि नाचू लागतात. कधी चिमुकलीच्या हाताला धरून गोल फिरवतात, तर कधी तिचे हात पकडून तिला हवेत उचलतात. चिमुकलीही त्यांच्याबरोबर अगदी स्वॅग आणि कॉन्फिडन्सने नाचतेय. कधी ती त्यांना सांभाळून घेत, तर कधी ते तिला सांभाळून घेत नाचतात. यावेळी आजूबाजूला उपस्थित पाहुणेदेखील टाळा – शिट्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देताना दिसतायत. डान्स जरी परफेक्ट नसला तरी आजोबा आणि नातीमधील प्रेम मात्र परफेक्ट दिसून आलं.
त्यामुळे व्हिडीओ पाहून युजर्सनीही आनंद घेतला. एका युजरनं लिहिलं की, ही या चिमुकलीसाठी आयुष्यातील सर्वांत सुंदर आठवण असेल. दुसऱ्यानं प्रेम व्यक्त करत लिहिलं की, हे तिघेही त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ घालवत आहेत.”
तिसऱ्यानं भावनिकपणे लिहिलं की, ज्या चिमुकल्यांनी आपल्या आजोबांना गमावलं आहे, ती या लहान मुलीच्या व्हिडीओद्वारे तिचं अपूर्ण स्वप्न जगत आहे.
